शिक्षकांच्या होणार फक्त विनंती बदल्या

ग्रामविकास विभागाचा आदेश

School

कोल्हापूर : कोरोना (Corona) संसर्गामुळे यंदाच्या वर्षी शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या करु नयेत. फक्त विनंती बदल्या कराव्यात असे आदेश ग्रामविकास विभागाने राज्यातील जिल्हापरिषद सीईओंना बुधवारी दिले. दरम्यान, विनंती बदल्यासही परवानगी देवू नये. संसर्गामुळे यंदाच्या वर्षी बदली प्रक्रिया थांबवावी अशी मागणी जिल्हापरिषद प्रशासनाने केली आहे.

जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्या करण्याबाबत ग्रामविकास विभागाने आदेश दिले होते. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात जिल्हा परिषदस्तरावर काही मुद्दे उपस्थित झाले होते. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची कार्यवाही करताना समुपदेशनाच्या वेळी इच्छुक शिक्षकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता होती. यापार्श्वभूमीवर कोरेनाचा प्रादुर्भावामुळे शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्यांची प्रक्रिया थांबविण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे.

प्रशासकीय बदल्यांच्या तुलनेत अत्यल्प असणाऱ्या विनंती बदल्यांची प्रक्रिया सुरू करावी. याची प्रक्रिया राबविताना सामाजिक अंतर व इतर शासनाच्या सूचनांचे पालन करावे. यावर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत विनंती बदल्या समुपदेशनाद्वारे कराव्यात. जिल्हांतर्गत विनंती बदल्यांची कार्यवाही करताना शिक्षकांच्या रिक्त पदांच्या समानीकरण संदर्भातील आदेशाचे पालन करावे , असे कक्ष अधिकारी एस. एन. भांडारकर यांनी काढलेल्या शासन आदेशात म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER