केवळ पवार आडनाव एवढंच आपलं कर्तृत्व…; भाजप नेत्याचा राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याला टोला

Atul Bhatkhalkar - Rohit Pawar - Maharashtra Today
Atul Bhatkhalkar - Rohit Pawar - Maharashtra Today

मुंबई : एकीकडे राज्यात कोरोनाचे संकट आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये चांगलेच ‘ट्विट वॉर’ रंगले आहे .केवळ पवार आडनाव एवढंच आपलं कर्तृत्व आहे, हे पंतप्रधानांवर टीका करण्यापूर्वी लक्षात ठेवलेत तर बरं होईल, अशा शब्दांत भाजपा नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला .

भारतात नवे संसद भवन महत्त्वाचे आहे की, देशातील नागरिकांचे लसीकरण, असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार केला होता. त्यामुळे कोरोना लसीकरणाच्या मुद्द्यावरून रोहित पवार आणि अतुल भातखळकर यांच्यात सोशल मीडियावर वादंग पेटले आहे .

राजकीय सोयीसाठी आयुष्यभर कोलांट्या मारणाऱ्या शरद पवार यांच्या नावाने भूमिका बदलण्याबाबत दुसऱ्यावर टीका करावी, हे जरा अतीच नाही का रोहित पवार? केवळ पवार आडनाव एवढंच आपलं कर्तृत्व आहे, हे पंतप्रधानांवर टीका करण्यापूर्वी लक्षात ठेवलेत तर बरं होईल, असे ट्विट करत अतुल भातखळकर यांनी रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button