‘जळगावात आता फक्त राष्ट्रवादी’ ; खडसेंच्या गर्जनेनंतर गिरिश महाजन लागले कामाला

Girish Mahajan - Eknath Khadse

जळगाव :- माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजपची (BJP) साथ सोडून राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश केल्यानंतर गिरीश महाजन (Girish Mahajan) जोरदार कामाला लागले आहेत. त्यांच्याकडून पक्षबांधणीचे काम वेगात सुरु आहे. महाजनांच्या उपस्थितीत जळगाव भाजपच्या पदाधिकाऱ्यांची रात्री तातडीची बैठक पार पडली. यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सर्वांनी मेहनत घ्यावी असे आवाहन महाजन यांनी केले.

जळगाव जिल्ह्यात भाजपला मजबूत करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक ही संधी आहे, त्यामुळे आपापसातील मतभेद बाजूला ठेवून कामाला लागा, अशी सुचना भाजपचे संकट मोचक, गिरिश महाजन यांनी कार्यकर्त्यांनी केली आहे.

“आपापसात काही मतभेद असतील, तर ते बाजूला ठेवून कामाला लागा. पुढे जिल्ह्यात नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका आहेत. ग्रामपंचायत निवडणुका म्हणजे भविष्यात असलेल्या निवडणुकांची रंगीत तालीम करण्याची नामी संधी आपल्याला आली आहे. यासाठी सर्वांनी मेहनत घ्यावी” असे आवाहन आमदार गिरीश महाजन यांनी केले.

खडसेंची गर्जना –

माजी मंत्री एकनाथ खडसे राष्ट्रवादीत गेल्यानंतर जळगावात आता पक्त राष्ट्रवादी अशी गर्जना केली होती. आता मी भाजपला ताकद दाखवून देतो असे आव्हानही त्यांनी दिले होते. “जळगावात (Jalgaon) भाजपचे अनेक कार्यकर्ते पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. हे कार्यकर्ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील”, असा इशाराही एकनाथ खडसे यांनी दिला होता. खडसेंच्या एकूणच गर्जनेनंतर आता गिरिश महाजन पक्षबांधणीच्या, स्थानिक सत्ता मिळवण्याच्या जोमाने कामाला लागल्याचे दिसत आहे.

ही बातमी पण वाचा : केरळमध्ये राष्ट्रवादी पक्ष फुटण्याची शक्यता  ; शरद पवार ‘डॅमेज कंट्रोल’ करण्यासाठी करणार दौरा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER