केवळ मुस्लिमांनाच बहुपत्नीत्वाची परवानगी नको; शरिया आणि IPC कलमाला आव्हान

Muslim

नवी दिल्ली : एका धर्मात बहुपत्नी प्रथा आणि इतर धर्मांमध्ये यावर प्रतिबंध लावण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही, अशी मागणी करणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ही प्रथा असांविधानिक, महिलांचा छळ आणि समानतेच्या अधिकाराचे उल्लंघन घोषित करा, अशी विनंतीही याचिकेत करण्यात आली आहे (Only Muslim Man Can Not Allowed To Have More Than One Wife).

अधिवक्ता विष्णू शंकर जैन यांनी पाच जणांतर्फे ही याचिका दाखल केली आहे. याचिकेत भादंवि  कलम ४९४ आणि मुस्लिम पर्सनल लॉ म्हणजेच शरिया कायदा, १९३७ च्या कलम २ ला असांविधानिक  घोषित करण्याची विनंती करण्यात केली आहे. याच कलमांतर्गत मुस्लिम पुरुषाला एकापेक्षा जास्त पत्नी ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. कलम ४९४ अंतर्गत धर्माच्या आधारे भेदभाव केला जातो असा आरोप करण्यात आला आहे. हिंदू, ख्रिश्चन किंवा पारसी व्यक्तीने पत्नी असताना दुसरे लग्न करणे कलम ४९४ अंतर्गत दंडनीय आहे.

पण, मुस्लिम व्यक्ती असे करू शकतो, ते दंडनीय नाही. त्यामुळे कलम ४९४ अंतर्गत धर्माच्या आधारावर भेदभाव केला जातो. हे घटनेचे कलम १४ आणि १५ (१)चे उल्लंघन आहे, असे याचिकेत म्हटले आहे. पत्नी किंवा पती जिवंत असताना विवाह करेल, तर त्या व्यक्तीला तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागेल.

ही शिक्षा सात वर्षांपर्यंत वाढवली जाऊ शकते. तसेच, त्या आरोपीला आर्थिक दंडही ठोठावला जाईल, अशी तरतूद भारतीय दंड संहितेच्या कलम ४९४ मध्ये आहे. याचिकाकर्त्यांनी कलम ४९४ मधून “अशा परिस्थितीत विवाह करणे अमान्य असेल”, हे वाक्य रद्द करण्याची विनंती केली आहे. “कलम ४९४ चा हा भाग मुस्लिम समाजातील बहु-विवाह पद्धतीला संरक्षण देतो. कारण, त्यांचा वैयक्तिक कायदा अशा विवाहांना परवानगी देतो. मुस्लिम समुदायात विवाह आणि घटस्फोटाची प्रकरणे मुस्लिम पर्सनल लॉ (शरिया) कायद्याच्या कलम २ च्या तरतुदीनुसार चालविली जातात”, असेही या याचिकेत म्हटले आहे (Only Muslim Man Can Not Allowed To Have More Than One Wife).

एकासाठी ते कृत्य दंडात्मक असेल आणि दुसऱ्यासाठी आनंदाचं साधन असेल असे वेगवेगळ्या वर्गांमध्ये भेदभाव कायदे सरकार करू शकत नाही. धार्मिक परंपरेच्या आधारे कोणत्याही गुन्हेगारी कृतीत भेदभाव केला जाऊ शकत नाही, असे याचिकेत म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER