केवळ नशीबवान : नदी बंधाऱ्यावरून नदीत पडली कार; व्हिडीओ व्हायरल

Car In Panchganga River Kolhapur Video

कोल्हापूर : कसबा बावडा ते वडणगे दरम्यानच्या राजाराम बंधारा येथे रविवारी चारचाकी थेट पंचगंगा नदीमध्ये (Panchganga River) कोसळली. सुदैवाने यामध्ये कसलीही हानी झाली नाही. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. वडणगेहून कसबा बावडाकडे चारचाकी वाहन येत होते. राजाराम बंधारा येथून कसबा बावडाकडे मार्गस्थ होत असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. चारचाकी वाहन थेट पंचगंगा नदीमध्ये कोसळले. परिसरातील नागरिकांनी आरडाओरड केली.

दरम्यान वाहनचालकाने प्रसंगावधान राखत वाहनातून बाहेर पडला. पोहत नदीकाठ गाठला. नागरिकांनी वाहनचालकाला सुरक्षित बाहेर काढले. मात्र पाण्याच्या प्रवाहात चारचाकी वाहून गेल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. राजाराम बंधाऱ्यावर दिवसभर वर्दळ असते. बंधाऱ्यावरून दुचाकी, चारचाकी वाहनांची ये-जा असते. रविवारी दुपारी घडलेल्या घटनेवरून पुन्हा एकदा बंधाऱ्यावरून वाहतूक करताना सुरक्षिततेचा विषय ऐरणीवर आला.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER