राज्यात सात ते आठ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा! जितेंद्र आव्हाडांनी केले हे आवाहन

Maharashtra Today

मुंबई :- कोरोनाचं (Corona) संकट वाढलेलं असतानाच राज्यात सात दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक राहिला आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेक महाविद्यालये आणि एनजीओ बंद होत्या. त्यामुळं रक्तसाठ्यावर याचा मोठा परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तरुण-तरुणींना रक्तदान करण्याचं आवाहन केलं आहे. स्वेच्छा आणि निस्वार्थी भावनेने रक्तदान करा, असं आवानह जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलं आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून हे आवाहन केलं आहे. राज्यात केवळ सात-आठ दिवस पुरेल इतका रक्तसाठा उरला आहे. आज कोरोनाला न घाबरता, सोशल डिस्टसिंग पाळून खासकरुन तरुण-तरुणींनी बाहेर पडून रक्तदान करावे. कुणाचे तरी प्राण वाचविण्यासाठी आपलं रक्त उपयुक्त ठरेल, ही भावना मनात ठेवून रक्तदान करा, असं ट्विट करत आव्हाड यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केलं आहे.

गेल्यावर्षी राज्यात कोरोनाची एंट्री होण्यापूर्वी दोन ते अडीच हजार रक्तदान शिबीरं दर महिन्याला आयोजित होत होती. मात्र कोरोनामध्ये अश्या शिबीरांमध्ये घट झाली. या कालावधीत ५० टक्के रक्तदानात घट झालेली आहे. पूर्वी ५० टक्के सामान्य नागरिक रक्तदान करायचे तर १५ टक्के कॉलेज व ३५ टक्के कॉर्पोरेट मधून रक्तदान शिबीरातून रक्त उपल्बध व्हायचे. मात्र कोरोनामुळे गेल्या काही महिन्यात ते उपलब्ध झाले नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button