केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि रुग्णांना एसटी, लोकल प्रवासाची परवानगी

ST Bus - Mumbai Local - Maharashtra Today
ST Bus - Mumbai Local - Maharashtra Today

मुंबई : संपूर्ण राज्यात आज रात्री ८ वाजल्यापासून लॉकडाऊन लागू होणार आहे. कोरोना (Corona) रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरकारने लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिकांना प्रवासासाठी अनेक निर्बंध येणार आहेत. आता केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि रुग्णांना एसटी, आणि लोकल प्रवासाची (Local Train) परवानगी देण्यात आली आहे. एसटीच्या फेऱ्या कमी होणार असून केवळ अत्यावश्यक सेवांसाठीच या एसटीच्या (ST Bus) फेऱ्या असतील, असं परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी स्पष्ट केलं आहे. तर सध्या जिल्ह्यांतर्गत आणि आंतरजिल्हा प्रवासावरही काही निर्बंध आलेले आहेत.तसेच विरोधकांच्या टीकेपेक्षा लोकांचे जीव वाचवणे हि आमची पहिली प्राथमिकता असल्याचेही परब बोलताना म्हणाले.

अनिल परब यांनी बोलताना सांगितलं की, आज रात्री ८ वाजेपासून लागू होणाऱ्या नव्या निर्बंधांनुसार, जिल्हांतर्गत, जिल्ह्याबाहेरही एसटी सुरु राहतील, पण त्या केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठीच सुरु राहतील. यासंदर्भात एसटीचा संपूर्ण कार्यक्रम कसा असेल? याची चर्चा करण्यासाठी मंत्रालयात अधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आलेली आहे. या बैठकीनंतर अंतिम निर्णय होईल. परंतु आता सरकारने ज्या काही गाइडलाइन्स दिलेल्या आहेत, त्यानुसार दोन्ही ठिकाणी एसटी चालतील फक्त या एसटी बस अत्यावश्यक सेवेसाठीच चालतील.असेही परब यांनी स्पष्ट केले.

तर आज रात्री ८ वाजेपासून रेल्वे प्रवासावर अनेक निर्बंध येणार आहेत. याबाबत बोलताना मुंबई रेल्वेचे डिआरएम गोयल यांनी अधिक माहिती दिली. त्यांनी रेल्वेच्या वेगळ्या गाईडलाईन्स नसल्याचे स्पष्ट केले. मात्र राज्य सरकारने ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत; त्याच गाईडलाईन्सचे पालन मुंबई रेल्वे करेल असे सांगितलं. तसेच, लॉकडाऊन लागू झाल्यानंतर मुंबई लोकलने सरकारी तसेच केंद्र आणि राज्य सरकारचे कर्मचारी यांनाच प्रवास करता येईल. त्यासाठी आयकार्ड बंधनकारक असेल. तसेच डॉक्टर्स, पॅरामेडिकल कर्मचारी, नर्सेस, लॅब टेक्निशियन्स यांनासुद्धा प्रवास करण्यास मुभा असेल. मेडिकल ऑर्गनायझेशनने दिलेले आयकार्ड दाखवून वरील कर्मचारी लोकलने प्रवास करु शकतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button