घुसखोरांना भाजपा सरकारच रोखू शकते – अमित शहा

Amit Shah

गुवाहाटी :- आसाममध्ये दोन समस्या आहेत, एक पूर आणि दुसरी घुसखोरी. भाजपाने राज्यातील घुसखोरी पूर्ण संपवली आहे, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी केला व भाजपाचे सरकारच घुसखोरांना रोखू शकते, अशी ग्वाही दिली.

अमित शहा ईशान्येकडील राज्यांच्या दौर्‍यावर आहेत. २०२१ आसाम विधानसभेची निवडणूक होणार आहे. अमित शहा यांनी गुवाहाटीमध्ये अनेक विकासकामांचे उद्घाटन केले.

अमित शहा म्हणाले की, एके काळी सर्व राज्यात फुटीरतावादी आपले अजेंडे चालवत होते. तरुणांच्या हातात बंदूक दिली जायची. हे सर्व फुटीरतवादी आपला मार्ग सोडून मुख्य प्रवाहात सामील झाले आहेत. निवडणुकीचा काळ सुरू होणार आहे, तेव्हा पुन्हा फुटीरतावादाचा मुद्दा पुढे येईल. हे लोक रंग बदलून पुन्हा तुमच्या समोर येतील.

शेतकरी आंदोलनाबाबत शहा म्हणाले की, सध्या शेतकरी कायद्यावरून मोठे आंदोलन सुरू आहे. सर्व शेतकर्‍यांनी चर्चेला यावे यावर उपाय शोधले जातील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER