उच्च न्यायालयाकडून केवळ चौकशीचे आदेश, मात्र सीबीआयने छापेच मारले – जयंत पाटील

Deshmukh-Jayant Patil

मुंबई :- सीबीआय न्यायालयाने दिलेल्या प्राथमिक चौकशी परवानगीचा वापर छापे मारण्यासाठी करत आहे. या माध्यमातून सीबीआय अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची बदनामी करून राजकीय उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली.

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत पदाचा राजीनामा दिला आणि सीबीआयच्या चौकशीला पूर्ण सहकार्य केले. याबाबतीत एकूण चार जणांची चौकशी झाली व चारही जणांनी समाधानकारक उत्तरे दिली असे सांगतानाच उच्च न्यायालयाने केवळ ‘प्राथमिक चौकशी’ करण्याचे आदेश दिलेले होते. या प्राथमिक चौकशीतून काय निष्पन्न झाले, याचा अहवाल कोर्टासमोर मांडण्यात आल्याचे अद्यापपर्यंत ऐकिवात नाही, याकडे जयंत पाटील यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. अँटिलिया व हिरेन हत्या प्रकरणात ज्यांना अटक करण्यात आली आणि ज्यांच्यावर संशयाची सुई आहे, त्यांच्या विधानावरून ही चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. या चौकशीच्या मिळालेल्या परवानगीचा उपयोग सीबीआय धाडसत्र घालून राजकीय उद्दिष्टे साध्य करताना दिसत आहे, असे जयंत पाटील यांनी ट्विट करत म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button