… ते मुख्यमंत्र्यांचे कौतुक की अब्रु काढणं हे अजित पवारच सांगू शकतात ; भाजपा नेत्याचा टोला

Ajit Pawar - Uddhav Thackeray - Atul Bhatkhalkar

मुंबई : राज्यात कोरोनाचे (Corona) संकट आहे . कोरोनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांचा इतका अभ्यास झाला आहे की ते अर्धे डॉक्टर झाले आहेत असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं होतं. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) वर्षपूर्तीनिमित्त एक पुस्तक प्रकाशित करण्यात आलं. त्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे वक्तव्य केलं होतं. यावरून भाजपा (BJP) नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी मुख्यमंत्र्यांना जोरदार टोला लगावला.

मुख्यमंत्र्यांनी कोरोनाचा एवढा अभ्यास केला की ते अर्धे डॉक्टरच झालेत, कोरोना त्यांच्यापाशी फिरकलाही नाही. हे मुख्यमंत्र्यांचे कौतुक आहे की अब्रू काढणे आहे हे फक्त अजित पवारच सांगू शकतात. त्यांनी संजय राऊत यांच्याकडून धडे घेतलेले दिसतायत, असे म्हणत भातखळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER