कोयना धरणात केवळ 2.46 टीएमसी ने वाढ

सातारा: जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने कोयना धरणात येणा-या पाण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. यामुळे धरणात गेल्या सहा दिवसांत केवळ 2.46 टीएमसीने पाण्याची साठा वाढला आहे. सध्या धरणात 85.95 टीएमसी ने पाण्याचा साठी उपलब्ध आहे.

विशेष म्हणजे, गेल्या रविवारीच कोयना धरणाचे दरवाजे दोन फुटांनी उघडून पाणी सोडले जात होते. आत्ता पाऊस मंदावल्याने दरवाजे अन् पायथा वीजगृहातील पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. जिल्ह्यातील महाबळेश्वर, कोयना, नवजा येथे चोवीस तासांत सरासरी शंभरहून मिलिमीटरहून अधिक पाऊस पडतो. पण या गावांमध्ये खूपच कमी प्रमाणात पाऊस पडत आहे.

शनिवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत कोयनेत केवळ ४, नवजामध्ये १३ तर महाबळेश्वरमध्ये ११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोयना धरणात केवळ ७२१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कोयना धरणात ८५.९७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.