लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य; कोविन व आरोग्य सेतु अ‍ॅपद्वारे नोंदणी कशी करावी?

Online registration mandatory for vaccination

मुंबई :- देशभरात १ मेपासून कोरोना लसीकरणाचा (Coronavirus Vaccination) तिसरा टप्पा सुरू होत आहे. यात १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरण देण्यात येणार आहे. यापूर्वी ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना लसीकरणासाठी परवानगी दिली होती. मात्र, आजपासून १८ ते ४४ वर्षांमधील लोकांना कोरोना (Corona) लसीकरण करण्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की, या लोकांना वॉक-इन किंवा थेट लसीकरण केंद्रांवर जाऊन लसीकरण करण्याची सुविधा मिळणार नाही. दरम्यान, रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्ही कोविन पोर्टल किंवा आरोग्य सेतु अ‍ॅपचा वापर करू शकता. लसीकरणासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे अनिर्वाय असेल. या लसीसाठी नोंदणी करणे सुरू केले आहे. कोविड-१९ लससाठी आपण स्वत:ची नोंदणी कशी करू शकता ते येथे आहे.

ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसे कराल?
१. Google Play स्टोरद्वारे आपल्या स्मार्टफोनवर Co-WIN अ‍ॅप डाऊनलोड करा.
२. Co-WIN अ‍ॅप उघडा आणि आपला मोबाईल नंबर रजिस्टर करा.
३. जो मोबाईल क्रमांक रजिस्टर कराल त्या नंबरवर OTP येईल. तिथे टाका आणि Verify वर क्लिक करा.
४. Vaccine Registraction form दिसेल, त्यामध्ये विचारण्यात आलेली माहिती भरा आणि Submit करा.
५. तुम्ही वॅक्सीनसाठी रजिस्ट्रेशनचा मेसेज मोबाईलवर येईल.
६. त्यानंतर schedule appointment वर क्लिक करा आणि तुम्ही राहात असलेल्या ठिकाणचा पिन कोड टाका.
७. लसीकरणासाठी Session निवडा. सकाळचे किंवा दुपारचे.
८. वॅक्सीन सेंटर आणि तारीख निवडा.
९. Appointment book केल्यास confirm करा.
१०. Appointment details चा मेसेज मोबाईलवर येईल.

आरोग्य सेतू अ‍ॅपद्वारे नोंदणी कशी करावी?

१. Google Play स्टोरद्वारे आपल्या स्मार्टफोनवर आरोग्य सेतु अ‍ॅप डाऊनलोड करा किंवा आधीपासूनच अ‍ॅप असल्याचे सुनिश्चित करा.
२. ऑन-स्क्रीनवर दिलेल्या सूचना वाचून स्वत:ची नोंदणी करा.
३. लसीकरण टॅबवर टॅप करा.
४. त्यात आपला मोबाईल नंबर रजिस्टर करा.
५. आता आवश्यक तपशील भरून लससाठी नोंदणी करा.

ही बातमी पण वाचा : राज्यात १८ ते ४४ वर्षाच्या प्रत्येकाला मोफत लसीकरण; मुख्यमंत्र्यांची घोषणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button