ठाण्यात ऑनलाइन दारू विक्रीला सुरुवात

Onlene Liquor Sell in Thane

ठाणे : जिल्ह्यातील प्रतिबंधितक्षेत्र वगळून इतर भागात घरपोच मद्य विक्रीला ठाणे जिल्हाधिकारी यांनी परवागनी दिल्यानंतर मद्याविक्रेत्यांनी आजपासून ऑनलाईन मद्यविक्रीला सुरुवात केली आहे.

अखेर दोन महिन्यानंतर मद्याची दुकाने अखेर रविवारी सुरु करण्यात आली. परंतु केवळ परवाना धारकांनाच मद्याची घरपोच सेवा देण्यात येत आहे. त्यामुळे अनेक विनापरवाना धारकांचा यामुळे हिरमोड झाला आहे. असे असले तरी, दुसरीकडे जिल्ह्यात सुरु झालेल्या घरपोच मद्य विक्र ीला मद्यप्रेमींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. रविवारी मद्य विक्रीला सुरुवात होताच अवघ्या २४ तासात जिल्ह्यात ५ हजार ८४५ मद्याप्रेमिनी या सेवेचा लाभ घेतला असल्याची माहिती ठाणे राज्य उत्पदान शुल्क अधीक्षक नितीन घुले यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला