मुंबईत ऑनलाईन मद्यविक्रीला परवानगी, नवे दिशानिर्देश जारी

मुंबई :- कोरोनाचा हॉट स्पॉट बनलेल्या मुंबईत आता ऑनलाईन पद्धतीने मद्यविक्रीला परवानगी देण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेने चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनसाठी स्वतंत्र नियमावली जाहीर केली आहे. यात मॉल्स, मार्केट बंदच राहणार असून अत्यावश्यक दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. महत्वाचं म्हणजे मुंबईत सरसकट दारु विक्रीला परवानगी दिलेली नाही. केवळ ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरुनच दारु विक्री करण्याची मुभा देण्यात आली आहे. तर, कंटेनमेंट झोन असलेल्या भागात कोणत्याही दुकांना उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही.

काय आहे नियमावली? 
  • मुंबईत सरसकट दारु विक्रीला परवानगी नाही.
  • मुंबईत केवळ ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरुनच दारु विक्री होईल.
  • कोणत्याही परिस्थितीत काऊंटरवर दारु विक्री होणार नाही म्हणजेच दारुची दुकाने उघडणार नाहीत.
  • कंटेनमेंट झोन वगळूनच दारु विक्री-खरेदी होईल.
  • सीलबंद बाटलीत व घरपोच दारु पोहोचवली जाईल.
  • परवाना असलेल्यांनाच दारु विक्री-खरेदी करता येईल.
  • कोणत्याही प्रकारे माल्स, मार्केट, बाजारपेठ बंद राहणार.
  • केवळ अत्यावश्यक दुकान उघडण्यास परवानगी. एकल दुकान सुरू होणार.
  • मात्र, कंटेनमेंट झोनमध्ये दुकानं बंद राहणार. एक रस्त्यावर पाच दुकान सुरू राहण्यास परवानगी.

Check PDF


Web Title : Online liquor sales allowed in mumbai, new guidelines issued

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER