उद्या सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणावर ऑनलाईन सुनावणी

Maratha reservation.jpg

मुंबई : मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) उद्या सुनावणी होणार आहे. ऑनलाईन पद्धतीने सुप्रीम कोर्टात (Supreme Court) ही सुनावणी होणार आहे. गेल्या वेळी ५ फेब्रुवारीला मराठा आरक्षणावरची सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर आता उद्या या महत्त्वाच्या प्रश्नावर सुप्रीम कोर्टात ही सुनावणी होणार आहे.

कोव्हिड संसर्गामुळे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्याची सुनावणी पार पडत आहे. मात्र व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी न घेता प्रत्यक्ष सुनावणी घ्यावी, अशी मागणी मराठा संघटना करत आहे. असं असलं तरी उद्याची (8 मार्च) सुनावणी मात्र ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे. दरम्यान, विरोधक प्रत्येकवेळी मराठा आरक्षणावर सरकार गंभीर नाही, असा आरोप करतायत. अशा वेळी मराठा आरक्षणावरची स्थगिती उठवण्यासाठी महाराष्ट्र सरकारची कितपत तयारी झाली, हा यानिमित्ताने प्रश्न आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER