सोमवारपासून अकरावीचे ऑनलाईन वर्ग होणार सुरू

Online Education

पुणे : सोमवारपासून इयत्ता अकरावीचे ऑनलाईन वर्ग सुरू केले जाणार आहेत. या वर्गांसाठी आत्तापर्यंत ६० हजार ३६० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. इयत्ता पहिलीपासून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषदेमार्फत सह्याद्री वाहिनीवर विविध शैक्षणिक कार्यक्रम सुरू करण्यात आले. त्यामुळे कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जात आहे.

इयत्ता ११ वी च्या विद्यार्थ्यांसाठी मार्च महिन्यापासून कोणताही शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला नाही. अकरावीची अकरावीची प्रवेश प्रक्रिया ठप्प झाल्यामुळे विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये चिंतेचे वातावरण आहे. घरी बसून विद्यार्थ्यांना अकरावीच्या कोणत्याही विषयाचा अभ्यास करता येत नाही. त्यामुळे शासनाकडून अकरावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने केव्हा शिकवले जाणार? असा प्रश्न विद्यार्थी व पालक यांच्याकडून विचारला जात होता.

ऑनलाईन वर्गासाठी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी केल्यानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गाचे वेळापत्रक व आवश्यक तपशील ई-मेल व मोबाईल क्रमांकावर पाठविला जाणार आहे. https://covid19.scertmaha.ac.in/eleventh इथे नाव नोंदणी करता येईल.

ऑनलाईन वर्गासाठी नोंदणी केलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांची संख्या

कला मराठी माध्यम : ४,५२७
कला इंग्रजी माध्यम : २,३३७
वाणिज्य मराठी माध्यम : ५,३५५
वाणिज्य इंग्रजी माध्यम: १२,९५६
विज्ञान : ३५,१८५

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER