कांदा जमिनीच्या खाली लागतो की वर; राहुल गांधींना माहीत आहे ? – शिवराजसिंह चौहान

Shivraj Singh Chouhan - Rahul Gandhi

भोपाळ : मोदी सरकारने (Modi Government) संसदेत मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात आंदोलन करणाऱ्या राहुल गांधी यांच्या शेतीबाबच्या ज्ञानाबाबत टोमणा मारताना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान ( Shivraj Singh Chouhan) म्हणाले, कांदा जमिनीच्या खाली लागतो की वर; हे तरी राहुल गांधींना माहीत आहे का?

राहुल गांधींनी (Rahul Gandhi) पंजाबमध्ये काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चावर टीका करताना चौहान म्हणाले – काँग्रेस (Congress) शेती कायद्यांबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करते आहे. राहुल गांधी ट्रॅक्टरवर सोफा लावून फिरत आहेत. शेतकरी किंवा शेतीबद्दल त्यांना काहीही माहिती नाही. कांदा जमिनीच्या वर उगवतो की खाली, हेदेखील त्यांना ठाऊक नसेल !

केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल, असे शिवराजसिंह चौहान म्हणाले.

दुसऱ्या ट्विटमध्ये काँग्रेसच्या भ्रष्टाचारावर टीका करताना ते म्हणाले- काँग्रेसच्या राजवटीत राज्य भ्रष्टाचाराचे केंद्र बनले होते. कर्जमाफीच्या नावावर शेतकऱ्यांची ६ हजार कोटींने फसवणूक करण्यात आली. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही. तत्कालीन मुख्यमंत्री कमलनाथ यांनी माझ्या सर्व योजना बंद केल्या होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER