कांदा – डोळ्यात पाणी आणणारा परंतु बहुगुणोपयोगी !

onion-Maharastra Today
onion-Maharastra Today

कांदा अनेक पदार्थाचा अवश्यमेव घटक. मसाल्याच्या भाज्या असो वा बिर्याणी, भारतीय पदार्थ असो वा चायनिज इटालियन, कांद्याशिवाय अधुरे. आयुर्वेदात पलाण्डु, कंदर्प, दुर्गंध, सुकंद अशा विविध नावाने आला आहे. कांदा हा चवीला गोड तिखट असतो. कांदा उत्तम वातशामक आहे. कांदा वेदनास्थापक, शोथहर असल्याने व्रण, विद्रधी, फोड असल्यास कांदा चिरुन तूपावर परतावे त्यात हळद घालून गरम असतांना बांधावा. यामुळे शूल त्वरीत थांबते. व्रण भरून येतो. चेहऱ्यावर वांग असल्यास कांद्याचा रस किंवा कल्क लेप करून लावतात.कान दुखत असल्यास कांद्याचा रस गरम करून कानात घातल्यास कर्णशूल थांबतो.

 • आकडी ( अपस्मार) , मूर्च्छा या व्याधींवर कांद्याचा रस नस्य किंवा कांदा फोडून हुंगावयास द्यावा. कांद्याच्या उग्रवासाने प्राणानुलोमन होऊन संज्ञा पुन्हा प्राप्त होते.
 • कांदा यकृतावर कार्य करतो. त्यामुळे अग्निमांद्य, कामला, अरुची या व्याधीत उपयोगी ठरतो. आले आणि कांदा यांचा रस एकत्र करून दिल्याने अजीर्ण अग्निमांद्य दूर होते.
 • कांदा दह्याबरोबर खाल्याने वात मूत्र पुरीष शरीराबाहेर निघण्यास मदत होते. ज्यांना मूळव्याधीचा त्रास, मलबद्धता असेल त्यांना दही आणि कांदा रस दिल्याने मल शुद्धी होते.
 • कांदा तीक्ष्ण असल्याने कफ बाहेर निघण्यास मदत होते. त्यामुळे श्वास कास या व्याधींवर फायदेशीर आहे.
 • कांदा शुक्रजनन आणि वाजीकर कार्य करणारा आहे. शुक्र दौर्बल्य, क्लैब्य या पुरुषांच्या समस्येवर कांदा रस तूप साखरेसह खावा.
 • कांदा तीक्ष्ण असल्याने मूत्रजनन कार्य करतो. लघवीचे प्रमाण कमी होणे, अडखळत मूत्रप्रवृत्ती होणे यात कांद्याचा रस उपयोगी ठरतो.
 • ऊन लागू नये म्हणून कांदा जवळ बाळगतात.
 • उग्र तीक्ष्ण असल्याने कृमींचा नाश करणारे व कृमींना मलावाटे बाहेर काढणारे हे कांदे आहेत.
 • केसांमधे कोंडा उवा झाल्या असल्यास कांद्याचा रस लावतात.
 • कांदा हा लसूणाच्या खालोखाल उत्तम वातहर औषध आहे. कांदा, मनाचे रज आणि तमदोष वाढवितो त्याच्या सेवनाने
 • तामस विचार येतात.
 • औषधी म्हणून हे आहार द्रव्य नक्कीच खूप उपयोगी आहे.

ह्या बातम्या पण वाचा :

Vaidya Sharwari Sandeep Mishal

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button