कांद्याचे: दर झाले कमी : भाजी आवक दुप्पट

Onion

कोल्हापूर : कोल्हापुरात बाजार समिती आणि व्यापाऱ्यांकडे रोज सरासरी ४५ ट्रक येणारा कांद्याची आवक सप्टेंबर महिन्यापासून १० ट्रकवर आली होती. आता सरासरी २५ ते ३० ट्रक आवक सुरू झाल्याने कांदा स्वस्त होत आहे. सरासरी ६० ते ८० रुपये दर असलेला कांदा (Onion) ३५ ते ४५ रुपये किलो दराने विक्री होत आहे. दरम्यान, भाजीपाल्याची आवकही दुप्पट झाल्याने दर पडले आहेत.

तीन महिन्यांपासून कांद्याचे दर चढेच होते. सोलापूर, पंढरपूर, अहमदनगर परिसरातून रोज २० ते २२ ट्रक कांदा बंद झाला होता. यापूर्वी ४५ ते ६० ट्रक इतकी रोज कांद्याची आवक होती. अतिवृष्टीमुळे कांद्याचे उत्पादन घटल्याने भाव गगनाला भिडले होते. आता बाजारात नवा कांदा येत आहे. बाजार समितीमध्ये रोज सरासर ३० ट्रक कांद्याची आवक आहे. १५ ते २० रुपयांवरुन ८० रुपये किलोपर्यंत गेलेला कांद्याचा भाव आता कमी होत आहे.

अतिवृष्टीने भाजीची आवक घटली होती. भाजीची आवकही आता वाढली आहे. दराची शंभरी पार केलेली पार भाजीचा दर कमी झाल्याने बळीराजाच्या अडचणी वाढल्या आहेत. ३० रुपये दराने विक्री होणारी मेथीची पेंडी सरासरी पाच रुपयांवर आली. बाजार साडेतीन हजार क्विंटल भाजीची आवक झाली. भाजी मार्केटमध्ये टोमॅटो, फ्लॅावर, वांगी, डब्बू मिरची, दुधी भोपळा, कोबी, रताळी, शेवगा शेंग, मेधी, भेंडी, गवार, कारले आदी भाज्या मुबलक आहेत. कोतंबीरसह पालक, पोकळा, आदी पालेभाज्यांची आवक वाढली आहे. ४० ते ५० रुपये किलो फळभाजीचा दर आहे. सफरचंद, सिताफळ, मोसंबी, बोरे, चिक्कू, पेरु, केळी आदी फळे बाजारात मुबलक उपलब्ध आहेत.

कोल्हापुरात अहमदनगर, सातारा, पुणे, सोलापूर आदी भागातून कांदा येतो. कांदा आवक घटली असतानाच अनलॉकनंतर हॉटेल व्यवसाय सुरु झाल्यानंतर कांद्याची मागणीही वाढली होती. दरम्यान, केंद्र शासनाने कांदा निर्यांत बंदी केल्याने उत्तर भारतात जुन्या कांद्याची मागणी वाढली. आता नवा कांदा बाजारात उपलब्ध झाल्याने दर कमी होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.