कांदा दरवाढ : आयकर विभागाची धाड ; बेकायदेशीर साठे केल्याचे उघड

Onion price hike

नाशिक : राज्यात कांद्याच्या दरात मोठी वाढ (Onion price hike) झाली आहे. आता कांदा रडवणार असे दिसत असतानाच कांद्याचे दर वाढविण्याचे षडयंत्र करत आणि कांद्याचे बेकायदेशीर साठे केल्याचे उघड झाले आहे. १२ व्यापाऱ्यांवर आयकर विभागाने छापा टाकला. कांदा उत्पादकावर टाकलेल्या आयकर विभागाच्या (Income tax department) छाप्यात २० कोटी रुपयांचे बेहिशोबी व्यवहार आढळून आले आहे.

नाशिक जिल्ह्यात लासलगावमध्ये १० तर पिंपळगावात एका आणि नाशिक शहरात एका अशा १२ व्यापाऱ्यांवर आयकर विभागाने छापा मारला. यावेळी संशयास्पद व्यवहार आढळल्याने काही व्यापारी रडारवर आले आहेत. याचा तसाप सखोल केला जाणार आहे. फायदा कमी दाखविण्यासाठी वाढीव खर्चांचे हिशोब केल्याचे तपासात उघड झाले आहे.

दरम्यान, लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद पाडले आहेत. आयकर विभागाने लासलगाव परिसरातील नऊ कांदा व्यापाऱ्यांवर छापा मारल्यामुळे दोन दिवसांपूर्वी एकाही व्यापाऱ्यांनी लिलावात भाग घेतला आहे. निर्यात बंदी केल्यानंतर देखील कांद्याचे दर वाढत असल्याने आयकर विभागाने कांदा व्यापाऱ्यांवर छापेमारी केली.

कांदा दरात वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मध्यंतरी केंद्र सरकारने अचानक निर्यातबंदी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाविरोधात उत्पादनांसह व्यापारी वर्गातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. केंद्र सरकारने कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील कांदा निर्यातिला परवानगी दिली. मात्र, त्यावेळी महाराष्ट्रातील कांद्याला डावलले गेले. या घटनाक्रमात कांद्याचे भाव मात्र कमी झाले नाहीत. बुधवारी (दि. १४) लासलगाव बाजार समितीत कांद्याला सरासरी प्रतिक्विंटल ४ हजार ३०० रुपये दर मिळाला. कृत्रिम टंचाई निर्माण करून व्यापारी दर वाढवतात. असा संशय नेहमी व्यक्त केला जातो. हा धागा पकडून प्राप्तीकर विभागाने काही व्यापाऱ्यांवर छापे टाकले होते. आयकर विभागाने संबंधितांनी खरेदी केलेला कांदा चाळीत साठवलेला कांदा आणि विक्री केलेल्या व्यवहारांची पडताळणी केली होती.

कर चोरीच्या संशयावरून 2017 सालातही अनेक कांदा व्यापा-यांवर छापे टाकण्यात आले होते. त्यात जवळपास १०० कोटीच्या व्यवहारात कर चोरी झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे आयकर विभागाच्या पथकाने मुक्ता नाशिक जिल्ह्यातील लासलगाव मधील दहा व्यापाऱ्यांसह पिंपळगाव आणि नाशिक शहरातील प्रत्येकी एक असा १२ कांदा व्यापा-यांच्या कार्यालयांचर छापा मारला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER