‘कांदा कैरी’ च लोणचं

Onion Pickle

जेवणात साधा कांदा तर आपण नेहमीच खात असतो. पण तुम्ही कधी या कांद्याचा लोणचं खाल्लय का?? नाही..?? तर आज आपण पाहणार आहोत पांढरे कांदे आणि त्याला आणखी चटपटीत करण्यासाठी कैरीचे लोणचं, हे बनविणे एकदम सोपे आणि चविष्ट आहे.

साहित्य:-
  • २ वाट्या पांढरे कांदे उभ्या फोडी
  • ३ वाट्या कैऱ्या उभ्या फोडी
  • मिठ चवीनुसार
  • तिखट
  • साखर चवीनुसार
  • हळद

कृती:- कांद्याच्या व कैरीच्या फोडी एकत्र कराव्यात. त्यात मिठ,तिखट,साखर व हळद घालावी. बरणीत भरून दर दोन दिवसांनी हलवाव. तेलाशिवाय केलेल्या या लोणचांंमधे छान रस सुटतो आणि चवीला देखील स्वादिष्ट वाटतो.