कांदा – डोळ्यात पाणी आणणारा परंतु गुणकारी

Onion

कांदा, स्वयंपाक घरात अवश्य असतोच. इतर भाज्यांच्या किंमती कमी जास्त झाल्या तर एवढा फरक पडत नाही परंतु कांद्याच्या किंमती वाढल्या की ब्रेकींग न्यूज बनते. कांदा भाज्यांना चव आणतोच शिवाय अनेक गुणही यात भरले आहेत. आयुर्वेदात याला पलाण्डु असे नाव आले आहे. जो अनेक रोगांपासून शरीराचे रक्षण करतो तो पलाण्डु. कांदा वात कमी करणारा आहे. नाडीशूल, विद्रधी, सूज यावर कांदा गरम करून पोल्टीस सारखा बांधावा त्याने शूल त्वरीत थांबतो.

चेहर्‍यावर वांग असेल, काळे डाग असतील तर कांद्याचा रस लावल्यास चेहरा स्वच्छ होतो. कान दुखत असेल तर कांद्याचा रस गरम करून कोमट असतांना कानात घालतात.  कांदा उग्र वासाचा असतो त्यामुळे फिट्स येणे, मूर्च्छा, आकडी यात कांद्याचा रस नाकात सोडतात किंवा कांदा नाकाजवळ धरतात ज्यामुळे संज्ञा प्राप्त होते.

व्रणावर कांदा चिरून तूपात भाजून बांधतात त्यामुळे व्रण लवकर बरे होतात. आलं कांदा यांचा रस एकत्र करून दिल्याने अजीर्ण भूक न लागणे अशा तक्रारी दूर होतात. मूळव्याधीवर कांदा रस तूप साखरेसह देतात. संधिवात सियाटिका यासारख्या वातरोगांवर कांदा उपयोगी ठरतो. मनाचे रज आणि तम दोष वाढवित असल्याने कांद्याच्या सेवनाने मनात तामसिक विचार येतात म्हणून बरेच जण चातुर्मासात कांदा खात नाहीत.

  • असे असले तरीही लसूणा खालोखाल उत्तम वातहर आहे.
  • कष्टार्तव दूर करणारा वाजीकर अश्या गुणांचा कांदा आहे.

उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून कांद्याचा रस हातापायाच्या तळव्यांना लावणे, कांदा जवळ बाळगणे हे पूर्वापार लोक घरच्या घरी करीत असतातच. असा हा कांदा तामसिक जरी मानला असला तरी अनेक व्याधीवर उपयोगी ठरणारा आहे हे नक्कीच.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER