‘ओएनजीसी’चे जहाज बुडाले; २६० पैकी १४७ जणांना नौदलाने वाचवले

ONGC ship sinks - Maharashtra Today

मुंबई :- अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळाच्या तडाख्यात बॉम्बे हायजवळच्या परिसरात ओएनजीसी’चे पी ३०५ (पापा-३०५) हे मोठं जहाज बुडाले. रविवारी सायंकाळी जहाजावरून ‘एसओपी’ संदेश मिळाल्यानंतर नौदलाने मदत व बचावकार्य हाती घेतले व १४७ जणांना वाचवले. जहाजावर २६० लोक होते. इतरांचा शोध घेणे सुरू आहे, अशी माहिती नौदल आणि ओएनजीसीच्या प्रवक्त्यांनी दिली.

मुंबईजवळच्या अरबी समुद्रात ‘बॉम्बे हाय’ तेथे तेलाचे उत्खनन होते. या परिसरात हिरा ऑईल क्षेत्रात ओएनजीसी’चे जहाज पी ३०५ उभे होते. रविवारी चक्रीवादळामुळे समुद्रात मोठ्या लता उसळल्या आणि जहाजाचा नांगर तुटला. जहाज भरकटायला लागले. जहाजावरून नौदलाला एसओपी (जहाज संकटात वा बुडत असल्याचा संदेश पाठवण्यात आला. मदतीसाठी INS कोच्ची, INS कोलकाता या दोन मोठ्या युद्धनौका पाठवण्यात आल्या, असे ओएनजीसीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.

आयएनएस कोच्ची आणि आयएनएस कोलकाता या युद्ध नौकांच्या मदतीला ओएनजीसीची समुद्र किनाऱ्याजवळ असलेली ‘ओएसव्ही’ आणि तटरक्षक दलाच्या ‘आयसीजी समर्थ’ या दोन नौकाही पाठवण्यात आल्या होत्या. ओएनजीसीच्या पी ३०५ जहाजाने जलसमाधी घेतली असून, असलेल्या २६० जणांपैकी १४७ जणांना सुखरूप वाचवण्यात नौदलाला यश मिळाले. नौदलाचे पी ८१ हे जहाज सकाळपासून समुद्रात इतरांचा शोध घेते आहे. शोध मोहिमेत ‘एनर्जी स्टार’ आणि ‘अहल्या’ या दोन नौकाही उतरवण्यात आल्या असल्याची माहिती नौदलाने दिली.

अत्यंत आव्हानात्मक स्थितीत रात्रभर शोध मोहीम सुरू होती. मंगळवारी सकाळपर्यंत पी ३०५ वरून १४६ लोकांना वाचवण्यात आले आहे. ‘आयएनएस कोच्ची’ आणि ‘आयएनएस कोलकाता’ या युद्धनौकांनी १११ लोकांना तर ‘ओएसव्ही’ आणि ‘ग्रेटशिप अहल्या’ या दोन्ही नौकांनी १७ लोकांना वाचवले. ‘ओएसव्ही ओशन एनर्जी’ या नौकेने १८ जणांना बाहेर काढले, असे नौदलाकडून सांगण्यात आले. ‘वारा प्रभा’ जहाजही चक्रीवादळाच्या तडाख्या सापडलं. जहाज भरकटल असून, आयएनएस कोच्ची या युद्धनौकेनं जहाजावरील दोघांना सुखरूप बाहेर काढलं आहे.

चक्रीवादळामुळे ‘गल कन्स्ट्रक्शन’ जहाज कुलाबा पॉईंटच्या उत्तरेस ४८ ‘सागरी मैल दूर गेले. त्यावर १३७ लोक होते. आपतकालीन मदत करणाऱ्या ‘वॉटल लिली’ आणि इतर दोन जहाजांना मदतीसाठी पाठवण्यात आले आहे.

‘आयएनएस तलवार’ ही युद्धनौकाही तेल उत्खनन होत असलेल्या अन्य क्षेत्रात मदतीसाठी पाठवण्यात आली आहे. ‘सागर भूषण’ आणि ‘एनएस ३’ या जहाजांच्या मदतीसाठी ही युद्धनौका पाठवण्यात आली असून, दोन्ही जहाज पीपावाव बंदरापासून दक्षिण पूर्वेस जवळपास ५० सागरी मैल दूर आहेत, अशी माहिती नौदलाने दिली.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button