‘वनकॉइन’ची दरोडेखोर : गुंतवणूकदारांचे ९० हजार कोटी घेऊन फरार

Maharashtra Today

मुंबई :- सन २०१६ मध्ये क्रिप्टोकरन्सी बिटकॉइनची लाट ओसरत होती. कारण तेव्हा ‘वनकॉइन (OneCoin)’ हे नवे क्रिप्टो चलन बाजारात आले होते. वनकॉइन बल्गेरियाच्या एका कंपनीने बाजारात आणले होते. या कंपनीची मालकीण होती रुजा इग्नाटोवा (Ruja Ignatova).

अतिशय हुशार असलेली रुजा इग्नाटोवा ही अतिशय सुदंरही आहे. तीच स्वतः वनकॉइनची ब्रँड अँबॅसिडर (OneCoin’s Brand Ambassador) होती. जगातील अनेक देशात जाऊन तिने – वनकॉइन हेच भविष्यातील चलन आहे, यात गुंतवणूक करणे अतिशय सुरक्षित आणि फायद्याचे आहे, असा प्रचार करून गुंतवणूकदारांना वनकॉइनमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आकर्षित केले. लोकांनी वनकॉइनमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली की वनकॉइनला चलन बाजारात ‘बिटकॉइन किलर’ म्हटले जाऊ लागले. वनकॉइनची किंमत सतत वाढत होती. वनकॉइनमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या रोज वाढत होती.

वनकॉइनच्या या अफाट यशाच्या मागे असलेल्या रुजा इग्नाटोवा हिलाही भरपूर प्रसिद्धी मिळाली. आर्थिक विषयक वृत्तपत्र आणि नियतकालिकांमध्ये तिच्यावर अनेक लेख- अहवाल छापून आलेत.

रुजा इग्नाटोवाचा जन्म बल्गेरियात झाला होता. तिचे शिक्षण ऑक्सफोर्ड विद्यापीठात झाले होते. तिने जर्मनीच्या विद्यापीठातून पीएच. डी. केली. नंतर जगातील आघाडीची व्यवसाय कंपनी मेकेंझी अँड कंपनीत नोकरी केली.

रुजा इग्नाटोवाने २०१४ ते २०१६ या तीन वर्षात जगभरातून सुमारे १२ अब्ज डॉलर गोळा केलेत २०१७ मध्ये तिने घोषणा केली की, ती आणखी एक नवी योजना आणणार आहे. जगभरातील गुंतवणूकदार रुजाच्या नव्या योजनेच्या घोषणेची वाट पहात असताना ती अचानक बेपत्ता झाली. वनकॉइनचे गुंतवणूकदार बुडालेत.

एफबीआय आणि एमआय 5 सारख्या एजन्सी तिचा राजाचा शोध घेत आहेत. ती सध्या ४१ वर्षांची आहे. आता तिच्याबद्दल विविध चर्चा कानावर येत आहेत. रुजाने प्लास्टिक सर्जरी करून चेहरा बदलला, असेही सांगतात. काहीका असेना पण गेल्या चार वर्षांपासून तिचा शोध घेणाऱ्या एजन्सीसह ती कुणालाही दिसली नाही हे खरे आहे. वनकॉइनच्या गुंतवणूकदारांचे ९० हजार कोटींपेक्षा जास्त पैसे बुडालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button