सनरायजर्स व नाईट रायडर्सचे एक विजय तुझा, एक विजय माझा!

KKR & SRH

सनरायजर्सने (Sunrisers Hyderabad) आयपीएलमधील (IPL) शनिवारचा सामना नाईट रायडर्सविरुध्द (Kolkata Night Riders) गमावला असला तरी आता 18 आॕक्टोबरला याच दोन संघादरम्यान पुन्हा लढत होईल, तेंव्हा सनरायजर्सचा संघ जिंकेल अशी शक्यता आहे. हे भाकित या दोन संघातील मागच्या सामन्यांचा इतिहास बघता खरे ठरण्याचीच शक्यता आहे.

या दोन संघात 22 मे 2016 पासून जे 11 सामने खेळले गेले आहेत त्यात एकदाही कुणाला सलग दोन सामने जिंकता आलेले नाहीत. पहिला सामना नाईट रायडर्सने जिंकला तर दुसरा सनरायजर्सने, मग पुन्हा नाईट रायडर्स आणि पुन्हा सनरायजर्स असे ते आलटून पालटून सामने जिंकत आले आहेत. त्यांच्यातील सलग दोन सामने एकालाही जिंकता आलेले नाहीत.

आता या दोन संघातील शेवटचा म्हणजे कालचा सामना नाईट रायडर्सने 7 गडी राखून जिंकला. त्यामुळे या एक मी, एक तू या मालिकेनुसार आता जिंकायचा नंबर सनरायजर्सचा आहे म्हणून 18 आॕक्टोबरला सनरायजर्स जिंकेल असे भाकित आहे.

सनरायजर्स व नाईट रायडर्समधील शेवटचे 11 सामने…

 • 2020— केकेआर—- सात गडी
 • 2019— एसआरएच- नऊ गडी
 • 2019— केकेआर—- सहा गडी
 • 2018— एसआरएच- 14 धावा
 • 2018— केकेआर—- पाच गडी
 • 2018— एसआरएच- पाच गडी
 • 2017— केकेआर—- सात गडी (डकवर्थ लुईस)
 • 2017— एसआरएच- 48 धावा
 • 2017— केकेआर—- 17 धावा
 • 2016— एसआरएच- 22 धावा
 • 2016— केकेआर—- 22 धावा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER