धाडीत जप्त झाले बेनामी एक हजार कोटी ! मोठ्या घोटाळ्याची शक्यता

2000 Rs Notes

चेन्नई : एका आयटी इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर ग्रुपच्या संबंधित आयकर विभागाच्या एका पथकाने मदुराई (Madurai) आणि चेन्‍नईसह (Chennai) पाच ठिकाणी धाडी टाकून एक हजार कोटी रुपये रोख रक्कम जप्त केल्याचं समोर आलं आहे. आयकर विभागाच्या (Income Tax Department) एका आधिकाऱ्याने हा मोठा घोटाळा (Scam) असल्याची शक्यता वर्तवली आहे. या  एक हजार कोटी रुपयांचा हिशेब किंवा नोंद नाही.

या धाडी ४ नोव्हेंबर रोजी टाकण्यात आल्या आहेत. सिंगापूरमधील एका नोंदणीकृत कंपनीमध्ये बेकायदा गुंतवणूक केल्याचा संशय आयकर विभागाला आहे; त्या संदर्भातील पुरावेही त्यांच्या हाती लागले आहेत. धाड टाकण्यात आलेल्या कंपनीशिवाय अन्य प्रसिद्ध अशा इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर डेव्हलपमेंट आणि फायनान्शिअल  ग्रुप कंपनीनेही यामध्ये शेअर विकत घेत गुंतवणूक केली आहे. आयकर विभागाने ज्या कंपनीवर धाड टाकली त्यांच्याकडे ७२ टक्क्यांचे शेअर आहेत. पण प्रत्यक्षात त्यांनी खूप कमी गुंतवणूक केली आहे.

त्याशिवाय इतर कंपन्यांचे शेअर कमी असले तरी गुंतवणूक जास्त आहे. आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सिंगापूरमध्ये स्थायिक असलेल्या कंपनीला चेन्नईतील या कंपन्यांनी तब्बल सात कोटी सिंगापूर डॉलरचा  (२०० कोटी भारतीय रुपये)  फायदा करून दिला आहे. कंपनीने ही माहिती लपवली आहे.

आयकर विभागाने याबाबतच्या प्रसिद्धिपत्रकात  म्हटले आहे की, आयकर विभागाने ४ नोव्हेंबर रोजी चेन्नई आणि मदुराईमध्ये पाच ठिकाणी धाडी टाकल्या. ‘ब्लॅक मनी अॅक्ट, २०१५’ नुसार यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. गुंतवणुकीची रक्कम २५४ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER