गोवंश हत्या हिंसाचारात पोलीस इन्स्पेक्टरचा मृत्यू

police

बुलंदशहर:  उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा काही गोरक्षकांनी दहशत निर्माण केल्याचे दिसते. राज्यातील बुलंद शहर जिह्ल्यामध्ये गोहत्येच्या संशयावरून हिंसाचार उसळला. यावेळी हिंसक जमावाने पोलीस ठाण्यावर हल्ला केला. यादरम्यान, हिंसक जमावाला रोखताना स्याना पोलीस ठाण्याचे पोलीस इन्स्पेक्टर सुबोध कुमार सिंह यांचा मृत्यू झाला. तसेच इतर दोन जणांचाही यात मृत्यू झाल्याचे माध्यमांतील वृत्तातून कळते.

गोरक्षकांनी मोठ्या प्रमाणावर मोडतोड आणि वाहनांची जाळपोळ केली. हिंसक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. यादरम्यान, हिंसक जमावाला रोखताना स्याना पोलीस ठाण्याचे पोलीस इन्स्पेक्टर सुबोध कुमार सिंह यांचा मृत्यू झाला. या प्रकारानंतर घटनास्थळावर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

बुलंदशहर जिल्ह्यातील स्यानामधील एका गावात शेतात गोवंश आढळला होता. त्यानंतर संतप्त झालेल्या लोकांनी रास्ता रोको केला. त्यावेळी पोलीस आणि जमावामध्ये वादावादी झाली. पोलिसांनी आंदोलनकर्त्या जमावावर गोळीबार केला. यात एक तरुण गंभीर जखमी झाला. त्यानंतर संतप्त जमावाने पोलीस ठाण्यावर हल्ला केला. तसेच मोठ्या प्रमाणावर मोडतोड आणि जाळपोळ केली. यात पोलीस अधिकारी सुबोध कुमार सिंह गंभीर जखमी झाले. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

माध्यमांतील वृत्तानुसार, स्यानामधील एका गावातील शेतामध्ये गोमांस आढळून आल्याने त्याविरोधात लोकांनी आंदोलन पुकारले. दरम्यान, पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली. यावेळी पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी गोळी चालवली. यामध्ये एक तरुण गंभीररित्या जखमी झाला. त्यानंतर अनियंत्रित जमावाने पोलीस ठाण्यावर हल्ला चढवला. दरम्यान, पोलिसांच्या कारवाईत जखमी झालेल्या एका तरुणाचा मेरठमध्ये उपचारांदरम्यान मृत्यू झाला.

एडीजी आनंदकुमार म्हणाले, सध्या इथली परिस्तिथी नियंत्रणात असून लोकांनी पोलिसांवर दगडफेक करायला सुरुवात केल्याने पोलिसांनी कारवाई केली. मात्र, ग्रामस्थांच्या वादामध्ये दुर्देवाने एका पोलीस अधिकाऱ्याला आपला जीव गमवावा लागला. इथल्या ग्रामस्थांनीही पोलिसांवर गोळीबार केल्याचा दावा एडीजींनी केला आहे.