गोराईच्या खाडीत बुडून एकाचा मृत्यू

Drowning copy

गोराईच्या खाडीत बुडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. याप्रकरणी गोराई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करत, अधिक तपास सुरु केला आहे. शिवपूजन दुबे (२७) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुबे हा मित्रांसोबत गोराई फिरण्यासाठी आला  होता. हे सर्व मीरारोडच्या काशीमीरा परिसरातील राहणारे आहे. दुबे आणि त्याचे तीन मित्र खाडीच्या कठड्यावर बसून पाण्याचा आनंद लुटत होतेभरतीची वेळ असल्याने हळुहळु पाण्याची पातळीत वाढ होऊ लागली.

हि बातमी पण वाचा : गारपिटीची पूर्वसूचना देण्याच्या तंत्रावर संशोधन सुरू

मात्र या चौघांनाही त्याची कल्पना नव्हती. या दरम्यान एक मोठी लाट आली आणि त्यामुळे वडवाना आणि दुबे पाण्यात पडून गटांगळ्या खाऊ लागले. अन्य मित्रांनी आरडाओरड करत मदतीसाठी गाववाल्याना बोलावले. तेव्हा त्यांनी घटनास्थळी धाव घेत पाण्यात उडी मारली आणि बराच वेळाने वडवाना त्यांच्या हाती लागला. मात्र दुबे खोल समुद्रात वाहून गेला. याबाबत गोराई पोलीसाना समजताच त्यांनी अग्निशमन दलाला त्याठिकाणी पाचारण केले. मात्र दुबे सापडला नाही आणि अखेर उशीरा रात्री त्याचा मृतदेह सापडला. याबाबत त्याच्या घरच्यांना कळवत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला. दुबे याच्या मित्रांचा जबाब नोंदविला जात असुन सध्या याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ही बातमी पण वाचा : म्हैसूर-जयपूर एक्स्प्रेसमधून पडून महिला जखमी