शिवसेनेचा आणखी एक नेता ‘ईडी’च्या रडारवर, भाजपकडून चौकशीची मागणी

मुंबई: पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी (PMC Bank scam case) संजय राऊत यांच्यापाठोपाठ शिवसेनेचा आणखी एक नेता सक्तवसुली संचलनालयाच्या (ED) रडारवर असल्याची माहिती समोर आली आहे. हा नेता शिवसेनेचा माजी खासदार असून अंडरवर्ल्डशी संबंध असलेल्या एका स्थानिक नेत्याचा नातेवाईक असल्याचे सांगितले जाते. हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एचडीआयएल) आणी PMC बँकेत झालेल्या आर्थिक व्यवहारप्रकरणी (PMC Bank Fraud) या नेत्याची ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता असल्याचे वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, एचडीआयएल PMC बँकेत घोटाळा करुन मिळवलेल्या निधीचा मोठा हिस्सा या राजकीय नेत्याला मिळाला आहे. त्यामुळे ईडीकडून आता या शिवसेना नेत्याची झाडाझडती घेतली जाणार असल्याचे सांगितले जाते.

संजय राऊत नंतर शिवसेने चा आणखी एक नेता पीएमसी बँक घोटाळा चा लाभार्थी! चौकशी व्हायलाच हवी असे ट्विट भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केले आहे. तसेच, व्हिडिओ शेअर करत त्या भाजप नेत्याची चौकशीची मागणीही सोमय्या यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER