दहा लाख ! महाराष्ट्रातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या, नवे २४,८८६

Corona Virus

मुंबई : कोरोनाच्याबाबत गंभीर स्थिती असलेल्या महाराष्ट्रात आज (११ सप्टेंबरला ) कोरोनाच्या रुग्णांची संख्या १० लाख १५ हजार ६८१ झाली आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. गेल्या २४ तासात राज्यात कोरोनाचे नवे २४ हजार ८८६ रूग्ण आढळले आहेत. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १० लाख १५ हजार ६८१ झाली आहे.

राज्यात आज दिवसभरात ३९३ रुग्णांचा मृत्यू झाला. १४,८०४ रुग्णांना सुटी मिळाली. राज्यात सध्या २ लाख ७१ हजार ५६६ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाच्या रुग्णांच्या मृत्यूचा दर २.८३ वर गेला आहे.

Check PDF :-प्रेस नोट ११ सप्टेंबर २०२०

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER