एक नेता महिलेला ‘टंच माल’, तर दुसरा म्हणतो ‘आयटम’ ! गांधी कुटुंब गप्प का? : स्मृती इराणी

Smriti Irani

नवी दिल्ली : मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भाजपाच्या नेत्या इमरती देवी यांना ‘आयटम’ म्हणाल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. यावर संताप व्यक्त करताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या, काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह महिलेला ‘टंचमाल’ तर कमलनाथ ‘आयटम’ म्हणतात तरीही गांधी कुटुंब गप्प का?

स्मृती इराणी म्हणाल्या, “काँग्रेसचे नेते नेहमीच महिलांचा मानभंग करतात. या संदर्भात आज देशाच्या राजकारणात मध्य प्रदेशच्या काँग्रेस नेत्यांची चर्चा होते आहे. एकिकडे महिलांना टंच माल म्हणणारे दिग्विजय सिंह आहेत आणि दुसरीकडे आहेत भाजपाच्या महिला नेत्याला ‘आयटम’ म्हणणारे कमलनाथ. आता गांधी कुटुंब गप्प का?”

कमलनाथ यांनी या प्रकरणी खंडवा येथे सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, “मी अपमान करण्याच्या उद्देशाने म्हटले नव्हते. ‘आयटम’ हा चुकीचा शब्द नाही. मला त्यांचे नाव आठवत नव्हते, म्हणून आयटम म्हणालो तर तो लगेच अपमान झाला!

कमलनाथ यांचा विरोध करण्यासाठी शिवराज सिंह चव्हाण, ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह भाजपाच्या अनेक नेत्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन केले. शिवराज सिंह यांनी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून कमलनाथ यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER