
नागपूर : गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी नागपुरात (Nagpur) पोलिसांसाठी मोठी घोषणा केली. महाराष्ट्रातील पोलिसांसाठी एक लाख घरे बांधली जाणार, अशी दिलासा देणारी घोषणा देशमुख यांनी केली. नागपूरमध्ये पोलिस महासंचालक शिबीर कार्यालयासह पाचपावली आणि इंदोरा येथील पोलीस अमलदारांचे शासकीय निवासस्थानाच्या उद्गाटनाप्रसंगी देशमुख यांनी ही घोषणा केली.
राज्यात पोलिसांसाठी घरांची कमतरता पडत आहे. त्यामुळे ते बांधण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरु केले आहेत. एखादा बिल्डर आपल्या जागेवर पोलिसांसाठी घर बांधून देत असेल, तर त्याला त्याला 4 एफएसआय आणि इतर सुविधा देण्याचा विचार सुरु आहे. ही सर्व घरं पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशनच्या नावानेच बांधली जाणार आहेत. जवळपास एक लाख घरं महाराष्ट्र पोलिसांसाठी बांधण्याची तयारी आम्ही केली आहे. कोरोनामुळे राज्य शासनाच्या भरवशावर राहून घर बांधली जाऊ शकणार नाही. त्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरुन पोलीस विभागातूनच घर बांधली जाईल, असेही अनिल देशमुख म्हणाले.
येत्या 26 तारखेपासून जेल टुरिझमला सुरुवात होईल. येरवडा जेलसोबत महात्मा गांधींच्या आठवणी आहे. येरवडानंतर इतर जेलमध्ये सुद्धा हे करण्यात येणार आहे. जेल कसा असते याची उत्सुकता नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना असते. त्यामुळे हे सुरु करण्यात येत आहे, असेही अनिल देशमुख यांनी सांगितले.
आणखी अद्यावत ड्रोन आणणार…
डिजी आणि सीपी कार्यालय हे फडणवीस सरकारने केलं आहे. आम्ही फक्त रिबीन कापतो आहे. त्यामुळे कधी त्यांनी केलेल्या कामचं आमच्या हस्ते उद्धाटन होते, तर कधी आम्ही केलेल्या कामाचं उद्धाटन ते करतात, असा टोलाही गृहमंत्र्यांनी लगावला. तसेच हॉर्स मौनटेड पोलीस युनिट नागपूरमध्ये सुरू करायच आहे, यासाठी मी प्रयत्न करत आहे. सेल्फ ब्लॅनसिंग स्कूटर, बॉडी वॉर्म कॅमेरा, ड्रोन हे आपल्याकडे आहेत. पण आणखी अद्यावत ड्रोन आणायचे आहे, असेही अनिल देशमुखांनी सांगितले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला