नोव्हेंबर महिन्यांत जीएसटी वसुली एक लाख कोटी

GST Collection

नवी दिल्ली : नोव्हेंबर (November) महिन्यातही जीएसटी वसुली (GST Collection) १ लाख ४ हजार ९६३ कोटी रुपये इतकी जीएसटी वसुली झाल्याचे सरकारने जाहीर केले. गतवर्षीच्या नोव्हेंबरच्या तुलनेत यंदाच्या नोव्हेंबरमध्ये झालेली वसुली१.४ टक्क्याने जास्त आहे. नोव्हेंबरमध्ये केंद्रीय जीएसटीच्या रूपात १९ हजार १८९ कोटी रुपये सरकारला प्राप्त झाले. याशिवाय स्टेट जीएसटीच्या रूपात २५ हजार ५४० कोटी रुपये, तर आयजीएसटीच्या रूपात ५१ हजार ९९२ कोटी रुपये प्राप्त झाले. उपकरांच्या माध्यमातून ८ हजार २४२ कोटी रुपये प्राप्त झाले.

आयजीएसटीमधील आयात वस्तूंवरील कराचे प्रमाण २२ हजार ७८ कोटी रुपये इतके आहे. रेग्युलर सेटलमेंटनंतर सरकारला नोव्हेंबरमध्ये केंद्रीय जीएसटीमधून ४१ हजार ४८२ कोटी रुपये, तर स्टेट जीएसटीमधून ४१ हजार ८२६ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. या काळातील आयातीवरील करवसुली ४.९ टक्क्यांनी जास्त झाली आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या काही महिन्यांत जीएसटी करवसुली मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाली होती. मात्र, ऑक्टोबर महिन्यात प्रथमच करवसुलीचा आकडा एक लाख कोटी रुपयांच्या पुढे गेला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER