एकाला मुंबई तर दुसऱ्याला बारामतीची चिंता; उर्वरित महाराष्ट्र बेवारस ठेवला- प्रकाश आंबेडकर

Uddhav Thackeray - Ajit Pawar - Prakash Ambedkar - Maharashtra Today

मुंबई : कोविड-१९ (COVID-19) च्या पहिल्या लाटेत उपाचारासाठी उभी केलेली यंत्रणा कायम न ठेवता ती मोडून टाकण्यात आली. त्यामुळे दुसरी लाट आल्यानंतर उपचाराविना लोकांचा जीव गेला. एकाचे मुंबई तर दुसऱ्याला बारामतीची जास्त चिंता आहे, उर्वरित महाराष्ट्र बेवारस ठेवला. हे महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे सह्याजीराव झाले असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला. यावेळी आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) लक्ष्य करत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्य सरकार फोल ठरल्याचंही त्यांनी म्हटलं. आंबेडकर यांनी अकोला येथे शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर टीका केली.

यावेळी आंबेडकर म्हणाले, कोरोना विषाणू कोविड-१९ च्या पहिल्या लाटेत उपाचारासाठी उभी केलेली यंत्रणा अधिक मजबूत करण्याऐवजी ती मोडून टाकण्यात आली. त्यामुळे दुसरी लाट आली तेव्हा उपचाराविना लोकांचा जीव गेला. कोविड विषाणू संसर्गाच्या संकटात आपत्कालीन व्यवस्थापनावर राज्य शासनाला आलेल्या अपयशाबाबत व तिसरी लाट थोपविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत मुख्यमंत्र्यांचे मुंबई तर उपमुख्यमंत्र्यांचे बारामतीवरच लक्ष आहे. उर्वरित महाराष्ट्र बेवारस ठेवला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी काम नाही केलं तरी चालेल, पण राज्यातील आपत्कालीन समित्या अधिक मजबूत करा. त्यामुळे नागरिकांना वेळेवर उपाचाराबाबत व आपत्कालीन व्यवस्थापनाबाबत योग्य सल्ला या समित्या देऊन मदत करू शकतील, असा सल्लाही त्यांनी राज्य सरकारला दिला.

कोविडची दुसरी लाट अनियंत्रित झाल्याने राज्य सरकार अपयशी ठरल्यात असल्याने ते बरखास्त का करण्यात येऊ नये, या प्रश्नावर बोलताना ॲड. आंबेडकर यांनी सध्याच्या परिस्थितीत सह्या करण्यासाठी कुणी तरी लागतं. सरकार बरखास्त केलं तर सह्या कोण करेल? त्यामुळे हे सह्याजीराव सरकार सुरू असल्याचे ते म्हणाले. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीला पराभूत करण्यासाठी कोविड-१९ ची दुसरी लाट हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओढून घेतलेले संकट असल्याचा आरोप ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button