झेडपी कर्मचार्‍यांचे सोमवारी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

One-day strike for ZP employees

ठाणे / प्रतिनिधी :- लिपिकांच्या ग्रेड वेतनात सुधारणा करुन समान काम समान वेतन, समान टप्पे करणे व मंत्रालय ते ग्रामपंचायत लिपिकांचे एक सारखे पदनाम करावे यांसह आदि मागण्या शासन दरबारी प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक कर्मचारी संघटनेच्या 615 वतीने सोमवारी एक दिवसीय लक्षणिक उपोषण केले. यावेळी मोठ्या संख्येने अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

डिसीपीएस, एनपीएस योजना बंद करुन मुळची 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू करावी. व 7 व्या वेतन आयोगाचा 3 वर्षाच्या फरक रोखीने देण्यात यावा, बक्षी समीतीच्या शिफारशी नुसार केंद्रीय कर्मचार्‍यांप्रमाणे लिपीकांस आश्‍वसित प्रगती योजनेचा लाभ 10,20 व 30 या तीन टप्प्यात करण्यात यावी, लिपीक संवर्गाची पदे बाह्य यंत्रणेमार्फत, कंत्राटी पध्दतीने निर्माण न करता ती स्थायी स्वरुपाची करण्यात यावी, पदोन्नती धारकास वरिष्ठ पदाचे किमान मुळ वेतनासाठी 22 एप्रिल 2009 चे अधिसुचनेत सुधारणा करणे, लिपीकांच्या अर्जित रजा साठविण्याची कमाल मर्यादा काढून टाकण्यात यावी, तसेच कॅशलेस वैद्यकिय सुविधा व लिपीकांचे नियमीत प्रशिक्षण देण्यात यावे आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक कर्मचारी संघटना 615 च्यावतीने वारंवार मोर्चे काढण्यात आले होते. मात्र, याची कोणतीही दखल शासन घेत, नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शासन दरबारी प्रलंबित असलेल्या मागण्या लवकरात लवकर मार्गी लागाव्या यासाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक कर्मचारी संघटनेच्या 615 वतीने सोमवारी एक दिवसीय लक्षणिक उपोषण केले. यावेळी मोठ्या संख्येने अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

ही बातमी पण वाचा : कडकनाथ कोंबडी घोटाळा : 16 रोजी सांगलीत मोर्चा