धुळे येथे दीड हजार ठेवीदारांची १० कोटींने फसवणूक

Money Fraud

धुळे(प्रतिनिधी) : आकर्षक व्याजदर, विविध प्रेक्षणीय स्थळी सहल आणि सोने-चांदी देण्याचे आमिष दाखवत धुळ्यातील १ हजार ४६१ ठेवीदारांची १० कोटी २९ लाख ४१ हजार ९५६ रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार धुळे येथे सोमवारी उघडकीस आला आहे.

या प्रकरणी सोमवारी रात्री उशिरा उज्ज्वलम अ‍ॅग्रो मल्टीस्टेट को आ.सोसायटी प्रा़ ली.नाशिक आणि माऊली मल्टीस्टेट क्रेडीट को ऑपरेटीव्ह सोसायटी लिमिटेड कंपनीच्या विष्णू रामचंद्र भागवत (रा़ गवंडगाव ता़ येवला, जि़ नाशिक), प्रफुल्ल निस्ताने (मुख्य कार्यकारी अधिकारी, नाशिक), अभिजीत येरुरकर (शिरुड कंपनीचे सचिव), सपना संदीप अमृतकर (शिरुड ता धुळे, शाखाचे मॅनेजर, हल्ली मुक्काम मेहूणबारे ता़ चाळीसगाव), भैय्यासाहेब यशवंत गुजेला (धुळे), भैय्या दिलीप अहिरे (धुळे) या संशयिताविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.