चित्रा वाघ फोटो मॉर्फप्रकरणात एकाला अटक

chitra wagh

यवतमाळ : भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्याविरोधात सोशल मीडियावर अश्लील पोस्ट टाकल्या होत्या. या प्रकरणी यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील दोन जणांविरुद्ध मुंबई क्राईम ब्रांचने गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी राहुल तुळशीराम आडे या व्यक्तीला अटक केली आहे. तर, संतोष राठोड हा अद्याप फरार आहे. ही कारवाई मुंबईच्या क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्याने केली आहे.

चित्रा वाघ यांना धमकीचे फोन आल्याची माहिती त्यांनी दिली. वाघ यांनी ३ मार्चला काही ट्विट केले आहेत. “दारू पिऊन मला अर्वाच्य अश्लील शिव्या, जीवे मारण्याच्या धमक्या देण्यातच बलात्काऱ्यांच्या समर्थकांचा पुरुषार्थ उरला आहे का ??? FIR होऊनही परिस्थितीत फरक पडला नाही.” या ट्विटवरून त्यांना पुन्हा एकदा धमकीचे फोन आल्याची शक्यता व्यक्त होत आहे. चित्रा वाघ यांना याआधी धमकीचे फोन आले आहेत.

त्यावेळी ट्विट करून त्यांनी माहिती दिली होती. धमक्यांना घाबरणारी चित्रा वाघ नाही, असा इशाराही त्यांनी दिला होता. “राजसत्तेकडे प्रचंड ताकद असते. सर्वसामान्य माणसाचा पाशवी राजसत्तेपुढे टिकाव लागू शकत नाही. मीडिया आणि सोशल मीडियाच्या व्यासपीठावरून ज्यांनी राजसत्तेला आव्हान देण्याचा प्रयत्न केला, त्यांना पोलीसबळाचा वापर करून चिरडण्याचे प्रकार दिवसाआड होतायत.” असे चित्रा वाघ ट्विटरवर म्हणाल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER