भोकर: शेतीच्या वादातून जातीवाचक शिवीगाळ करणार्‍या एकास अटक

; अन्य दोन आरोपी फरार

arrested

भोकर/ तालुका प्रतिनिधी: शेतीच्या वादातून जातीवाचक शिवीगाळ करणारे पांडुरणा येथील बालाजी शिंदेंना भोकर पोलिसांनी 12 फेब्रुवारी रोजी अटक केली आहे. या प्रकरणातील माधव शिंदे आणि रामेश्वर शिंदे हे दोघे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

पांडुरणा ता. भोकर येथे फिर्यादी माधव गायकवाड आणि बालाजी शिंदे यांची सामायिक शेती आहे. शेतीच्या मोजणीवरून आणि मालकी हक्कावरून वाद झाला. यावेळी आरोपी बालाजी विश्वनाथ शिंदे, माधव शिंदे आणि रामेश्वर शिंदे यांनी माधव गायकवाड यांना जातीवाचक शिवीगाळ केली. भोकर पोलिसात न्यायालयाच्या आदेशानुसार मागील महिन्यात तिघांविरुद्ध अँट्रासिटी अँक्टप्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. पोलीस आरोपींचा शोध घेत असताना बुधवारी या प्रकरणातील आरोपी बालाजी शिंदें यांना पांडुरणा येथील आश्रम शाळेवरून अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. अटक केल्यानंतर बालाजी शिंदे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना नांदेड येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले . या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बी. मुदीराज, सपोनि एस. बी. डेडवाल हे करीत आहेत.