मुंबईला दीडशे धावाही ठरतात विजयाला पुरेशा!

Mumbai Indians - Maharastra Today
Mumbai Indians - Maharastra Today

आयपीएलमध्ये (IPL) दीडशे धावा करुनही पुन्हा-पुन्हा, पुन्हा-पुन्हा सामना जिंकता येवू शकतो हे फक्त मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) संघच करू शकतो. 2013 च्या आयपीएलमध्ये तर त्यांनी तीन सामने एवढ्या कमी धावसंख्येचे रक्षण करत जिंकले होते आणि शनिवारीसुध्दा सनरायझर्स हैदराबादविरुध्द (SRH) तसाच विजय मिळवला. 150 धावांचे रक्षण करतानाही ते आपल्या गोलंदाजांच्या दमदार कामगिरीने सनरायझर्सला 13 धावांनी भारी पडले.

नवव्या षटकापर्यंत 1 बाद 71 अशी विजयाकडे वाटचाल करणाऱ्या डेव्हिड वाॕर्नरच्या संघाने त्यानंतर जणूकाही आत्महत्याच केली. अखेरचे 5 गडी तर फक्त आठ धावांतच आणि 13 चेंडूतच गमावले. त्यामुळे 1 बाद 71 वरुन सर्वबाद 137 असा त्यांचा डाव गडगडला.

मुंबईला असे 150 पेक्षा कमी धावसंख्येचे सामने जिंकणे हे काही विशेष नाही. 10 वेळा त्यानी दीडशेपेक्षा कमी धावांचे यशस्वी रक्षण केले आहे आणि याबाबतीत सनरायझर्स व पंजाब किंग्जच्या पंक्तीत ते येऊन बसले आहेत.

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने दीडशेपेक्षा कमी धावांचेही यशस्वी रक्षण केलेले सामने असे..

धावा — विरुध्द ——-वर्ष
150 – हैदराबाद – 2021
149 – चेन्नई ——- 2019
136 – हैदराबाद — 2019
129 – पूणे ——– 2017
142 – दिल्ली —- 2017
148 – चेन्नई ——- 2013
139 – चेन्नई ——- 2013
148 – चेन्नई ——- 2013
120 – पूणे वाॕरियर्स- 2012
148 – कोलकाता — 2009

दीडशे पेक्षा कमी धावांचे यशस्वी रक्षण करुन जिंकलेले सामने

10 – मुंबई इंडियन्स
10 – सनरायझर्स हैदराबाद
10 – पंजाब किंग्ज
08- चेन्नई सुपर किंग्ज
08 – कोलकाता नाईट रायडर्स
05 – राॕयल चॕलेंजर्स बंगलोर
03 – राजस्थान राॕयल्स
01 – दिल्ली कॕपिटल्स

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button