अमेरिकेतून परतलेल्या या डॉक्टराच्या संस्थेमुळं दिड कोटी नेत्र रुग्णांना मिळालेत उपचार, ३० लाख डॉलर्सचा पटकवलाय पुरस्कार!

One and a half crore eye patients received treatment through this organization of doctors who have returned from the United States!

हैद्राबादची एलवी प्रसाद नेत्र संस्थान (LVPEI)अंधत्व निर्वाणासाठी काम करतीये. जागितक आरोग्य संघटनेच्या संयुक्त कोलॅबरेटीव्ह सेंटरच्या रुपातून काम केलं जातंय. एलव्हीपीआयचे संस्थापक डॉ. गुलापल्ली नागेश्वरराव यांना ‘द आउटस्टंडींग अचिव्हमेंट’ (The Outstanding Achievement) पुरस्कार देण्यात आला. या पुरस्काराच्या माध्यमातून त्यांना ३० लाख युएस डॉलर्स देण्यात आलेत.

गीनबर्गचा उल्लेख आंधळेपणा रोखण्यासाठी संपूर्ण जगभरात संशोधन करणाऱ्या लोकांना जोडण्याच काम करते.

आज भारतात एलव्हीपीइआयचे शेकडो दवाखाने आहेत. डॉ राव यांच्या या संस्थेच्या माध्यमातून दिड कोटी नेत्र रुग्णांवर उपचार करण्यात आलेत.

कुटुंबाचा वारसा

डॉ राव यांचे वडील गोविंदप्पा वेंकट स्वामी भारतातल्या महान नेत्र चिकित्स्कांपैकी एक होते. त्यांनी गरिब रुग्णांच्या उपचारासाठ चैन्नईत अरविंद नेत्र चिकित्सालायाची स्थापना केली. वडीलांच्याच पावलावर पाउल ठेवत डॉ राव यांनी सेवाभावाचे कार्य पुढं चालू ठेवण्यासाठी नेत्र चिकीत्सक बनण्याचा निर्णय घेतला.

आंध्राच्या गुटुंरमध्ये त्यांनी वैद्यकिय शिक्षण पुर्ण केल्यानंतर दिल्लीच्या एम्समधून ऑपथॅल्मोलॉजीमध्ये ग्रज्यूएशन पुर्ण केलं. यानंतर १९७४मध्ये ते पुढच्या शिक्षणासाठी अमेरिकेला गेले. बोस्टन येथील टफ्ट्स युनिवर्सिटी स्कुल ऑफ मेडिसिनमधून त्यांनी प्रशिक्षण पुर्ण केलं यानंतर ते रोचस्टर स्कूल ऑफ मेडिसीनला गेले. इथं त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं.

अमेरिकेसोबतच त्यांनी युरोप, ऑस्ट्रेलिया आणि अशियातील नामांकित वैद्यकिय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं.

आय बँकिंग, कॉर्निया ट्रान्सप्लांट, आय केअर पॉलीसी अँड प्लॅनिंग या विषयातली महारथ डॉ.राव यांनी मिळवली. यासोबतच अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ३००हून अधिक रिसर्च पेपर त्यांनी प्रकाशित केलेत.

संस्थेची स्थापना

१९८१ला डॉ. राव भारतात परतले. हैद्राबादमध्ये जागतिक दर्जाच नेत्र रुग्णालय असावं असा त्यांचा मानस होता. त्यामुळं विदेशातली ऐशोआरामच आयुष्य सोडून त्यांनी भारतात परतनं पसंत केलं. यातून रुग्णांची योग्य काळजी, शिक्षण आणि संशोधनाला वाव मिळेल असा त्यांचा विचार होता.

आयुष्यभराची कमाई त्यांनी दान केली आणि आंध्राप्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री एनटी रामाराव यांच्याकडे शैक्षणिक संस्था उभारणीसाठी जमिन प्रदान करण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी जमिन देवू केली आणि या जमिनीवर ‘पब्लिक हेल्थ आणि ऑप्टोमेट्रीक इज्यूकेशन’ हा विभाग सुरु केला.

यानंतर १९८५ला त्यांना लोकप्रिय सिनेदिग्दर्शक एल. व्ही. प्रसाद यांचे पुत्र रमेश प्रसाद यांच्याकडून ५ करोड रुपये आणि ५ एकर जमिन मिळाली आणि डॉ राव यांनी एलव्ही प्रसाद आय इन्स्टिट्यूटची स्थापना केली.

नेत्र उपचाराच्या क्षेत्रासाठी दिलं भरीव योगदान

इंटरनॅशनल एजन्सी फॉर प्रिवेंशन ऑफ ब्लाइंटनेस (IAPB)च्या महासचिव आणि सीईओ पदाची जबाबदारीचा अनूभव डॉ राव यांच्यांकडे होता. जगभरात अंधत्व निवार्णासाठी त्यांनी मोठी भरीव कामगिरी केली. त्यांच्या चिकित्सक कार्यांसाठी त्यांना २००२मध्ये भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्या आलं.

त्यांनी उभारलेल्या संस्थेच्या माध्यमातून तब्बल दिड कोटी नेत्र रुग्णांवर डॉ. राव यांनी उपचार केलेत. गेल्या दोन दशापासून भारत अंधत्व मुक्त करण्यासाठी डॉ राव प्रयत्नशील आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER