कधीकाळी हमाली करणाऱ्या खांद्यांवर देशाच्या निर्मितीची जबाबदारी येऊन पडली होती !

V. P. Menon. - Maharastra Today

भारत १९४७ साली स्वातंत्र्याच्या शेवटच्या टप्प्यावर होता. अखंड भारताच्या निर्मितीचं सत्ताधारी कॉंग्रेस पुढं ध्येय होतं. हे ध्येय पुर्ण करायला ‘डिपार्टमेंट ऑफ स्टेट’ उभारण्यात आलं. याचं नेतृत्व दोन महत्त्वाच्या व्यक्तींकडे होतं. पहिले होते देशाचे निडर नेते, उपपंतप्रधान सरदार वल्लभाई पटेल आणि दुसरे त्यांचे सहियोगी व्ही. पी. मेनन. ज्यांच नाव अधुनिक भारताच्या इतिहासात दिसून येत नाही.

पटेलांनी तत्कालीन राजांच्या संस्थानांना भारतात समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करत होते. पटेलांच्या योजना प्रत्यक्षात उतरण्याची जबाबदारी होती व्ही. पी. मेनन यांच्यावर. ते वैयक्तिक स्तरावर यासाठी काम करत होते.

एका राजाच्या दरबारातून दुसऱ्या दरबारात जाणे. राजासमोर प्रस्ताव ठेवणे. त्याला समजावणे. करारावर सह्या करण्यासाठी मन वळवणे ही कामं त्यांना करावी लागत होती. अशावेळी काही अडचणींना देखील त्यांनी तोंड दिलं. एका राजानं तर त्याच्या डोक्याला बंदूक लावली होती. मेनन यांच्या सहासी कार्याची झलक अनेक पुस्तकांमधूल पहायला मिळते. भारताच्या राजकीय एकिकरणात अत्यंत महत्त्वाची भूमिका मेनन यांनी पार पाडली.

सुरुवातीचा काळ

वाप्पला पंगुन्नि मेनन यांचा जन्म केरळच्या ओट्टापालम नावच्या छोट्या गावात जाला. ३० सप्टेंबर १८९३ साली. त्यांचे वडील एका शाळेत मुख्याध्यापक होते. मेनन बारा भावंडांपैकी सर्वात मोठे होते. एवढ्या मोठ्या परिवाराला चालवणं इतक सोप्प नव्हतं. कमी आर्थिक मोबदला असताना सुद्धा त्यांच्या वडीलांनी हे आव्हान पेललं. १० पर्यंतच शिक्षण घेऊन मेनन यांनी नोकरीचा शोध सुरु केला. त्यांच्या वडीलांच्या खांद्यावरील जबाबदारीचं ओझं त्यांना कमी करायचं होतं.

शिमला

रोजंदारीची कामं करण्यापासून कोळसा खाणीतपर्यंत त्यांनी सर्व प्रकारची कामं केली. काही काळ हमालीदेखील त्यांनी केली. कापूस व्यवसायात उतरण्याचा अयशस्वी प्रयत्नही त्यांनी केला. मेनन यांनी नेहमी पुढं जायचं होतं. त्यांनी बंगळुरुमध्ये तंबाखू कंपनीत क्लार्कची नोकरी धरली. इंग्रजी भाषेवरील त्यांची पकड चांगली होती. प्रत्येक परिस्थीतीला समजून त्यातून वाट काढण्याची त्यांच्याकडे क्षमता होती.

काही काळानंतर सरकारी नोकरीसाठी त्यांनी शिमला गाठलं. तिथं १९२९ साली गृह कार्यालायात त्यांना क्लार्कची नोकरी मिळाली. त्यांची टायपिंग स्पीड चांगली होती. त्यांच्या लिखाणात चुकाही होत नसत. यामुळं ब्रिटीश अधिकाऱ्यांची त्यांनी मर्जी जिंकून घेतली.

‘सेनसिटीव्ह रिफॉर्म डिपार्टमेंट’मध्ये स्थालांतरीत झाल्यानंतर भारताचे बराचकाळ व्हाइस रॉय राहिलेल्या लॉर्ड लिनलिथगो यांचे विश्वास पात्र बनले. मेनन यांच्याकडे खुप सारी महत्त्वपुर्ण माहिती असायची. अनेक निर्णयांवर मेनन यांचा सल्ला विचारला जाऊ लागला. लॉर्ड लिनलिथगो यांच्यासोबत अनेकदा त्यांनी इंग्लंडला भेट दिली. राउंड टेबल कॉन्फ्रेंसला उपस्थीत असलेले ते एकमेव भारतीय अधिकारी होते. त्यांनी लुईसपासून ते लॉर्ड वॉवेल यांच्यापर्यंत अनेक व्हाइस रॉयांसोबत काम केलं. त्यांच्या कामाच्या पद्धती आणि कार्यकुशलतेमुळं मेनन यांनी अनेकांना प्रभावित केलं.

१९४६ साली मेनन यांची नियुक्ती भारताचे शेवटचे व्हाइस रॉय लॉर्ड माउंटबॅटन यांच्या राजकीय आयुक्तपदी करण्यात आली. त्यावेळी भारतीय स्वातंत्र्य संग्राम शेवटच्या टप्प्यात होता. इंग्रज भारताला स्वातंत्र्य प्रदान करण्यास सकारात्मक होते. इंग्रजांकडून भारताची राजकीय शक्ती भारताला देण्यासाठी लागणारी रणनिती बनवण्याची जबाबदारी मेनन यांच्याकडे होती.

मेनन यांच्या योजना आणि भारतीय राज्यांच एकीकरण

माउंट बॅटन यांची योजना भारताला दोन नाही तर डझनभर हिस्स्यांमध्ये वाटण्याची होती. प्रत्येक संस्थानिकाला वेगळे अधिकार मिळावेत. संस्थानिकांनी राष्ट्र म्हणून उभारी घ्यावी अशी माउंट बॅटन यांची इच्छा होती. माउंट बॅटनच्या विखंडनाच्या आणि अव्यवस्थित प्रस्तावावर नेहरुंनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. नेहरुंनी मेनन यांना बोलावून या योजनेचा विकल्प बनवण्यास सांगितलं. दोघांनी सहा तास सलग चर्चा करुन योजना तयार केली होती.

मेनन कार्यकुशलतेच्या जोरावर पटेलांचे जवळचे सहकारी बनले. पटेलांवर भारताच्या एकीकरणाची जबाबदारी होती. पटेल आणि मेनन यांनी मेहनत घेतली आणि ५०० संस्थात वाटला गेलेला भारत एक राष्ट्र म्हणून उदयास आला. या प्रक्रियेत मेनन यांच्यावर अनेक बरे वाईट प्रसंग ओढावले. जोधपुरच्या महाराजानं तर मेनन यांच्या डोक्याला बंदूक लावली होती. यातून ते बचावले पण तसुभर कामातून माघारी हटले नाहीत.

काश्मिरचा तिढा सोडवत काश्मिरला भारता आणण्यासाठी नेहरु आणि पटेलांइतकी मेहनत मेनन यांची देखील होती. भारताच्या एकिकरणात त्यांची मोठी भुमिका होती. आजही अनेकांच्यासाठी ‘मेनन’ रहस्य आहेत. त्यांच्या योगदानाला जगासमोर आणून प्रशासकिय अधिकाऱ्यांची सकारात्मक प्रतिमा उभी करणं आजची गरज आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button