कधीकाळी शिवसेनेनं मुस्लीम लीगशी केली होती युती!

सध्या वाढता कोरोना (Corona) आणि मुंबई मनपा निवडणूकीत कॉंग्रेस आणि शिवसेनेची भूमिका हे दोन विषय चर्चेत आहेत. भाजपला सत्तेतून बाजूला सारत महाविकास आघाडीनं (Mahavikas Aghadi) सत्ता ताब्यात घेतली. पण मनपा निवडणूकांमध्ये शिवसेना कॉंग्रेस एकत्र लढू शकतात का? त्यांच्या एकत्र लढण्याच्या संभावना काय? आणि मतदारांवर त्यांचा काय परिणाम होईल. या चर्चेला उत आलाय.

डाव्यांचा बिमोड करायला मुंबईत कॉंग्रेसच्या वरदहस्तामुळं सेना वाढली. असं अनेक राजकीय विश्लेषक सांगतात. कधीकाळी सेनेला ‘वसंत सेना’ म्हणलं जायचं. कारण तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईकांनी शिवसेनेला मोठं केलं असा एक मतप्रवाह आहे. शिवसेना उभारी घेत असताना मुंबई कॉंग्रेस चिंतेत होती. तेव्हा एका दिवसात शिवसेना बंद पाडीन इतकी ताकद मी ठेवून असल्याचं, वसंतराव नाईक एका चर्चेमध्ये म्हणाले होते.

पण शिवसेनेने संघटनात्मक बांधणीच्या जोरावर मुंबईत ताकद वाढवली आणि मुंबई मनपा काँग्रेसकडून ताब्यात घेतली. तेव्हापासून कॉंग्रेस विरोधी बाकावर आहे. आता गणित बदलली आहेत. पारंपारिक शत्रु असणारे आणि विरुद्ध विचारधारेचे दोन्ही पक्ष एकत्र सत्तेवर आहेत. अशा परिस्थीतीत शिवसेना आणि कॉंग्रेस एकत्र लढतील का? असा सवाल उपस्थीत होतोय.

कट्टर हिंदूत्वाचा पुरस्कार करणारी शिवसेना कधीकाळी मुस्लीम लीग सोबत निवडणूकीच्या मैदानात उतरली होती. शिवसेनेचा हा इतिहास बघता कॉंग्रेससोबत युती करुन निवडणूकीला शिवसेना सामोरी जाईल, असं मत काही राजकीय विश्लेषक व्यक्त करतायेत.

शिवसेनेनं अनेकदा परिस्थीतीशी जुळवून घेण्यासाठी वेगवेगळ्या पक्षांसोबत युती केली आहे. त्याचा हा इतिहास

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार बनलं आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. शिवसेनेची भूमिका इतकी कशी बदलली असा बऱ्याच जणांचा सवाल होता पण राजकारणावर बारीक लक्ष ठेवून असणाऱ्यांना फारस काहीसं आश्चचर्य वाटलं नाही.

कॉंग्रेस-शिवसेनेचं नातं तसच बरच जुनंय. महाराष्ट्राच्या राजकारणात अशा अनेक घटना घडल्या ज्या या नात्याला अधोरेखीत करतील. राष्ट्रपती निवडणूकीत कॉंग्रेसला समर्थनक देणं असो की सुप्रिया सुळेंना बिनविरोध निवडणं किंवा वैचारिक मतभेद असलेल्या मुस्लीम लिगशी हात मिळवणी असो की, भाजपला बगल देत नवी राजकारण साधण्याचा सेनेचा जूना इतिहासाय.

पक्षस्थापने नंतरच्या पहिल्या दसरा मेळाव्यात (१९६६) ‘राजकारण म्हणजे गजकर्ण’ म्हणणारे बाळासाहेब नंतर राजकीय खेळी लीलया खेळू लागले. रस्त्यावरील हाणामारींमुळे राजकारणात शिवसेनेला पूर्वी मित्र मिळत नव्हते. कम्युनिस्ट आमदार कॉ. कृष्णा देसाई यांची हत्या (जून १९७०), शिवसेनेतील दगाबाजीनंतर ठाण्यातील सेना नगरसेवक श्रीधर खोपकर यांचा झालेला निर्घृण खून (एप्रिल १९८९), भिवंडी दंगल (१९७०) यांसारख्या घटनांमुळे शिवसेनेला जवळ करणे इतर राजकीय पक्षांना गैरसोयीचे वाटायचे. अशा परिस्थीतीतही, बाळासाहेबांनी याच काळात हिंदुत्वाला अग्रभागी आणले. भाजपशी युती केल्यानंतर १९८४ मध्ये विलेपार्लेतील विधानसभेच्या पोटनिवडणुकीत हिंदुत्वाचा खुलेआम पुरस्कार करून हे कार्ड चालू शकते, याचा राजकीय संदेश दिला आणि राजकारणात शिवसेनेला अधिकाधिक जवळ करण्यासाठीच्या हलचालींना त्याकाळात राजकीय पक्ष प्रयत्न करू लागले.

गेल्या पाच दशकांत झालेल्या विविध निवडणुकांत शिवसेनेच्या राजकीय भूमिका कसकशा बदलत गेल्या, त्या भूमिका बदलाचे टप्पे महाराष्ट्राच्या राजकारणाला कायमस्वरुपी बदलणारे ठरलेत.

आणीबाणीवेळी इंदिरा गांधींना समर्थन

१९६६ ला स्थापना झालेल्या शिवसेनेचे कॉंग्रेसशी सुरुवातीपासूनच लागेबांधे असल्याची अनेकदा चर्चा होते. मुंबईतील कम्युनिस्ट चळवळींचा बिमोड करण्यासाठी कॉंग्रेसचे त्यावेळचे मुख्यमंत्री वसंतराव नाईकांनी केली बोललं जातं. १२ वर्षानंतर ही गोष्ट अधोरेखित झाली जेव्हा शिवसेनेनं कॉंग्रेसच्या तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधींनी 1977 ला लादलेल्या आणीबाणीला समर्थन दिलचं आणि नंतर झालेल्या लोकसभेत उमेदवार ही उतरवले नाहीत.

महापौर निवडणूकीत कॉंग्रेसला समर्थन

शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात १९६३ ते १९७४ मध्ये सेनेचं कॉंग्रेसकडंच झुकत माप पाहता लोक सेनेला ‘वसंत सेना’ म्हणायचे. १९७८ मध्ये जनता पार्टीशी युती करण्याचा प्रयत्न फ्लॉप गेल्यवार सेनेनं कॉंग्रेसचा हात हाती घेतला.

इंदिरा कॉंग्रेसच्या नेतृत्त्वाचा या गटासोबत भागीदारी करणाऱ्या सेनेच्या वाटी त्यावेळी ३३ विधानसभेच्या जागा आल्या होत्या. पण इंदिरा विरोधी लाटेनं सेनेचा सुफडा साफ केला. सेनेचा ३३ च्या ३३ जागांवर पराभव झाला

मुस्लीम लिगशी हातमिळवणी

१९७०च्या मुंबई महानगरपालिकेचा निकाल लागल्यानंतर शिवसेनेचं जनता पक्षाची व्यवस्थीत जुळलं नाही.अशावेळी बाळासाहेबांनी मोठा निर्णय घेतला होता. महापौर निवडीच्यावेळी शिवसेनेचा कट्टर विरोधक राहिलेल्या मुस्लीम लीगशी हात मिळवणी केली होती. तसेच ते मुस्लीम लीगच्या नेत्यांसोबत एकत्र मंचावरही दिसले होते. असं जेष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी त्यांच्या ‘जय महाराष्ट्र’ या पुस्तकात लिहलंय.

‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER