पुन्हा महाराष्ट्राची मान शरमेनं खाली, महिला अत्याचारच्या नवीन प्रकरणाने महिला संतप्त

Violence Against Women

जळगावानं (Jalgaon) संपूर्ण महाराष्ट्राच लक्ष वेधलंय. पुजा चव्हाणच्या (Pooja Chavan) आत्महत्येनंतर स्त्री सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला असतानाच जळगावात झालेली घटना गंभीर असल्याच दिसतंय.

जळगावच्या सरकारी गर्ल्स होस्टेमध्ये काही पुरषांनी प्रवेश करत महिलांना कपडे उतरावयाला लावून त्यांच्यापुढे नाचगाणी कारयाला भाग पाडलं. असा गंभीर आरोप केला गेला आहे.

काही कामानिमित्त सामाजिक कार्यकर्ते या होस्टलच्या इथं गेले होते. त्यांना सदर प्रकाराची भनक लागलीय पण सुरक्षा रक्षकाने त्यांना आत पाठवलं नाही. दुरुन मोबाईलवर व्हिडीओ शुट करुन हा घडला प्रकार त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडला.

जळगावचे जिल्हाधिकारी अभिजीत राउत (Abhijeet Raut) यांनी सदर घटनेच्या चौकशीचे आदेश दिलेत.

हॉस्टेल प्रबंधकांवर टीका

चेहरा दिसू नये अशी मागणी करत वरच्या मजल्याच्या खिडकीतून युवतीनं घडला प्रकार सांगितला. आम्हाला कपडे उतरवून नाचण्यासाठी मजबूर केलं जातंय. राशनच्या धान्यापासून आम्हाला दिलं जाणारं जेवण खाण्यालायक नाहीये. व्हिडीतल्या मुलीनं हॉस्टेल प्रबंधकांवर गंभीर आरोप केलेत .

तर दुसऱ्या बाजूला हॉस्टेल अधिकारी रंजना जोपे यांनी बाजू मांडली. व्हायरल व्हिडीओतील मुलीबद्दल त्यांनी धक्कादायक खुलासा केलाय. ज्यामुलीचा हा व्हिडीओ व्हायरल झालाय ती मानसिकरित्या आजारी आहे. तिनं अनेक गर्भवती मुलींना मारहाण केल्याचही त्या जोपे सांगतायेत.

जिल्ह्याचे महिला आणि बालकल्याण अधिकारी विजयसिंह परदेशी यांनी हॉस्टेलला भेट देवून परिस्थीती समजून घेतली. त्यांनी मुलींशी चर्चा केलीी. हॉस्टेलमध्ये मुलींच्या सुरक्षेला कोणताच धोका नसल्याचे स्पष्ट केलंय.

विधानसभेत फडणवीसांनी वेधलं या प्रकरणाकडे लक्ष

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सदर घटनेतील दोषींवर कारवाईची मागणी केलीये. महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी जळगावच्या घटनेच्या गांभीर्यावर बोट ठेवत दोषींना कठोरातली कठोर शिक्षा केली जाईल असं सांगितलंय.

गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी सदर घटनेबद्दल चौकशीचे आदेश दिलेत. या घटनेची निष्पक्ष तपासणी होईल असं आश्वासन त्यांनी दिलंय.

स्थानिकांच्या धक्कादायक प्रतिक्रिया

विविध माध्यमांच्या प्रतिनिधींनी वसतिगृहाच्या परिसरातील शेजार्‍यांच्या या घटनेबाबत प्रतिक्रया घेण्याचा प्रयत्न केला. यावर शेजार्‍यांनी गंभीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. या वसतिगृहाबाहेर अवेळी कधीही मुलं यायची आणि वसतिगृहातील महिलांकडे बघून इशारे करायचे. दोन वर्षांपासून या संस्थेत वाईट प्रकार घडतात आहेत. शिस्त नावाची कुठलीच गोष्ट या वसतिगृहात नाही. तसेच बाहेरुन आलेल्यांना आतमध्ये प्रवेश दिला जात नसला, तरीसुद्धा मुले बाहेरुन मुलींशी बोलातात आणि विशेष म्हणजे हा प्रकार संस्थेच्या कर्मचार्‍यांच्या डोळ्यांसमोर घडत असल्याचेसुद्धा सांगीतले.

वस्तिगृह हलवण्याची केली जातीये मागणी

या परिसरातील काही महिलांनी हे वसतिगृह येथुन हलवण्याची मागणीसुद्धा केली आहे. “आम्हाला बोलू दिलं जात नाहीये, प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतोय” अशी ती मुलगी खिडकीतून ओरडून सांगत होती. असं त्या व्हीडीओ फितीतून स्पष्ट ऐकायला येतंय. या प्रकरणामुळं महाराष्ट्रातील स्त्रीयांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चव्हाट्यावर आलाय.

यामुळे महाराष्ट्राची शरमेनं खाली गेलीये अशा संतप्त प्रतिक्रीया समाज माध्यमात उमटत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER