शिवसेना ईडी (ED) विरोधात उतरणार रस्त्यावर

Shivsena-ED

मुंबई :- गेल्या काही दिवसात शिवसेना (Shivsena) नेत्यांवर ईडीने (ED) केलेल्या कारवाईमुळे शिवसेना आक्रमक झाली आहे. ५ जानेवारीला संजय राऊत यांची पत्नी वर्षा चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात जातील तेव्हा त्यांच्यासोबत शिवसैनिकही असतील अशी व्यवस्था करणे सुरू आहे.

ही गर्दी जमण्यासाठी मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, मिरा भाईंदरमधून बसेस, कारने शिवसैनिक येणार आहेत.

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्यापाठोपाठ शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही ईडीची नोटीस आल्याने शिवसेना आक्रमक झाली आहे. प्रताप सरनाईकांसह त्यांच्या दोन्ही मुलांनाही ईडीची नोटीस आली आहे. ईडीच्या नोटीस हा सरकार पाडण्यासाठी केंद्र सरकारचे षडयंत्र असल्याचा शिवसेनेने आरोप केला होता.

ही बातमी पण वाचा : ‘आताची शिवसेना बाळासाहेबांची राहिलेली नाही’, नामांतरणावरून मनसेचा सेनेवर हल्लाबोल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER