
सांगली :- उत्तर भारत, गुजरात, गोव्यासह देशभरात मागील दोन महिन्यांपासून कमी झालेली कोरोना (Corona) रुग्णसंख्या आता वाढू लागली आहे. खबरदारी म्हणून राज्य शासनाने गुजरात आणि गोव्याहून येणाऱ्या नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास विमानतळ, रेल्वेस्टेशनसह अन्य ठिकाणी अलगीकरण कक्षात थांबावे लागणार आहे. दुसऱ्या लाटेच्या भीतीने अनेकांनी पर्यटन लांबणीवर टाकले आहे. तर दिवाळीनिमित्त पर्यटनास गेलेल्या लोकांत घबराटीचे वातावरण आहे.
परदेशासह देशांतर्गत प्रवास करणाऱ्यांची कसून तपासणी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी खबरदारी घेतली जात आहे. बुधवारपासून (दि.२५) राज्याच्या सीमेवर तपासणी होणार असल्याने अनेकांनी मंगळवारीच परतीचा निर्णय घेतला. दिवाळी सुटीनिमित्त अनेक जण कोकण, कर्नाटक आणि गोव्याला गेले आहेत. तपासणीनंतर अलगीकरण कक्षात राहण्याची वेळ येणार असल्याने पर्यटनासाठी गेलेल्यांमध्ये घबराट आहे. पर्यटन निम्म्यावर टाकत अनेकांनी कोल्हापूरचा रस्ता धरला आहे. तर नियोजित दौराही अनेकांनी रद्द करत लांबणीवर टाकला. अंबाबाई दर्शनासाठी परराज्यातून भाविक मोठ्या संख्येने येतात. दरवर्षी दिवाळीदरम्यान पर्यटकांची गर्दी असते. गेल्या दोन दिवसांत गर्दी वाढत असतानाच राज्याच्या सीमेवर तपासणी होणार असल्याने याचा परिणाम पर्यटकांच्या संख्येवर होणार आहे.
ही बातमी पण वाचा : जानेवारीपर्यंत कोरोना लस उपलब्ध होणार, पंतप्रधान मोदी सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला