World Earth Day च्या निमित्ताने – आयुर्वेद आणि निसर्ग जतन !

World Earth Day-Ayurveda

22 एप्रिल International Earth Day म्हणून साजरा केल्या जातो. आपण या धरतीला माता मानतो. या पृथ्वीचे, निसर्गाचे जतन करणे हे आपले कर्तव्य तर आहेच परंतु प्रत्येक प्राणी वनस्पती मनुष्याचे जीवन चक्र सुरळीतपणे सुरु राहण्याकरीता या निसर्गाचे संरक्षण करणे देखील महत्त्वाचं आहे. आयुर्वेद हे आयुष्य वेद म्हटले आहे. मनुष्याच्या आयुष्याचा आरोग्याचा जरी यात विचार केला असला तरी निसर्गाचा समतोल राखूनच सर्व चिकित्सा सांगितल्या आहेत. निसर्गाला हानी पोहचणाऱ्या केमिकल्सचा विचार नाही. औषध निर्माण असो वा औषधी संकलन दरवेळी निसर्गाचा ऋतुचा परिपक्वतेचा विचार केला आहे.

आयुर्वेदात (Ayurveda News) औषधी तीन प्रकारची सांगितली आहेत. प्राणिज ( प्राण्यांपासून प्राप्त होणारी उदा. दूध मध मूत्र ) औद्भिद (जमिनीतून वर उगविणारी उदा वनस्पती वृक्ष लता पुष्प फल इ.) पार्थिव ( जमीनीच्या आत किंवा भूगर्भात खाणीत सापडणारी उदा. स्वर्ण लोह सैंधव इ.)

या प्रकारांवरुन आपल्याला लक्षात येईल की नैसर्गिकरित्या उपलब्ध प्रत्येक द्रव्यांचा औषधी म्हणून कसा उपयोग होतो हे आचार्यांनी वर्णन केले आहे. त्याचे गुण औषधी प्रयोग मात्रा यांचा सखोल व विस्तृत ज्ञान हजारो वर्षापूर्वी लिहिलेल्या आयुर्वेदातून प्राप्त होते.

औषधी द्रव्य संग्रह कधी करावा याचाही विचार आयुर्वेदात केला आहे. कधीही कोणतेही अवेळी धान्य, वनस्पती, फळ तोडणे हे योग्य नाही त्यात पूर्ण गुण येत नाही. वनस्पती संग्रह करण्यापूर्वी त्या औषधी वनस्पतीचे पूजन करून योग्य स्थितीतले द्रव्य; नक्षत्र दिशा यांचा विचार करून तोडण्यास सांगितले आहे.

मूळ शिशिर किंवा ग्रीष्म ऋतुमधे तर शाखा आणि पत्र वसंत आणि वर्षा ऋतुमधे, साल शरद ऋतुमधे तर कंद हेमंत ऋतु मधे संग्रह करण्यास सांगितले आहेत. त्या काळात औषधी जास्त वीर्यवान गुणवान असतात. एवढा सखल विचार करणारे आयुर्वेदशास्त्र आहे.

आयुर्वेदात आहारकल्पना असो वा औषधीकल्पना कुठेही निसर्गाला हानीकर द्रव्यांचा उपयोग नाही.

ऋतुचा विचार, त्यानुसार चर्या आहार, अकाल ऋतु लक्षणे याचे विस्तृत विवेचन आचार्यांनी केले आहे. देश प्रांतानुसार आहार विहाराची शैली ही मनुष्याला सवयीची होते. ती स्वस्थ ठेवणारी आहे. म्हणूनच सात्म्याचा विचार आयुर्वेद करायला लावतो.

आहार असो वा औषधी चिकित्सा आयुर्वेद शास्त्र मानवाच्या कल्याणाकरीता जरी लिहीला असला तरी निसर्गाला कुठेही बाधा होणार नाही हे सुद्धा तेवढेच जपले आहे. चरकाचार्य नुसार जगातील एकही द्रव्य असे नाही की जे औषधी उपयोगी नाही त्या द्रव्याचा युक्तीने वापर करावा म्हणजे औषधि कर्म अनुभवायास येते. म्हणूनच आपल्या पृथ्वीवरील प्रत्येक तत्त्वाचे द्रव्याचे जतन करणे गरजेचे आहे.

Vaidya Sharwari Sandeep Mishal

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button