शिवजयंतीनिमित्त रायगड 18, 19 ला 48 तास शिवभक्तांसाठी मोफत खुला राहणार

On the occasion of Shiva Jayanti, Raigad will be open for free for 48 hours on 18th and 19th

मुंबई : छत्रपती शिवरायांच्या 391 व्या जयंतीनिमित्ताने (Shiva Jayanti)राजधानी रायगड 18 व 19 फेब्रुवारी रोजी शिवभक्तांसाठी 48 तास खुला राहणार आहे. यासाठी शिवभक्तांना कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी रायगड किल्ल्याला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी शिवजयंतीच्या निमित्ताने रायगडवर ज्योत नेण्यासाठी तसेच शिवरायांच्या दर्शनासाठी येणार्‍या शिवभक्तांना कोणत्याही प्रकारचे शुल्क न आकारता त्यांना प्रवेश मिळावा, तसेच 18 व 19 फेब्रुवारी असे दोन दिवस 48 तास पूर्णवेळ रायगड सुरू रहावा, अशी मागणी डॉ. शिंदे यांनी सांस्कृतिक तथा पर्यटन राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल व केंद्रीय पुरातत्त्व विभाग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. या मागणीला केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे संचालक डॉ. अरविंद मंजुळ यांनी मान्यता दिली आहे.

रायगड नेहमी सकाळी 7 ते सायंकाळी 5 पर्यंत सुरू असतो. त्यामुळे शिवजयंतीला येणार्‍या शिवभक्तांना रायगड सर करणे अडचणीचे ठरत होते. आणि जयंतीला कोणतेही शुल्क आकारले जाऊ नये, या मागणीला आज मूर्त स्वरूप आले. या निर्णयाचे शिवभक्तांनी स्वागत केले आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे अभिनंदन केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER