Menstrual hygiene day च्या निमित्ताने आयुर्वेदाची रजःस्वला परिचर्या व शास्त्रविचार !

Ayurveda - Menstrual Hygiene Day

Menstrual hygiene विषयी जागरूकता यावी या दृष्टीने २८ मे हा Menstrual hygiene day आहे. मुलगी वयात येणे ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीयांच्या शरीरात अनेक बदल घडतात. रज प्रवृत्ती सुरु झाल्यावर मुलींना वाटणारे वेगळेपण स्वतःच्या शरीरात घडणारा बदल भिती थोडा संकोच आणि सर्वात मोठा प्रश्न स्वच्छता यावर खरंतर डॉक्टर आई शिक्षिका यांच्यासह चर्चा अपेक्षित असते. पाळी येणे हे नैसर्गिक आहे हे जसे सहज सांगितले जाते तसेच पाळीच्या दिवसात घेण्यात येणारी काळजी सुद्धा शास्रोक्त पद्धतीने समजवून सांगणे आवश्यक आहे.

स्त्रियांचे आरोग्य चांगले राहावे याकरीता नियमित पाळी येणे, 3 -४ दिवस रजःस्त्राव होणे हे गरजेचे आहे. या दिवसात काय काळजी घ्यावी आहार कसा असावा याबद्दल आयुर्वेदात रजःस्वला परिचर्या सांगितली आहे. स्त्री शरीरातील या शुद्धीला अडथळा येऊ नये, दोषांचे असंतुलन होऊ नये तसेच स्त्री शरीरातील गर्भाशय बीजग्रंथी यांचे कार्य व्यवस्थित राहावे, गर्भधारणा स्वाभाविक रित्या व्हावी याकरीता रजःस्वला परिचर्या सांगितली आहे. याकाळात रजः प्रवर्तनास अडथळा होऊ नये म्हणून आराम करणे आवश्यक आहे (अर्थात याचा उद्देश आराम हा आहे परंतु त्याचा विपर्यास झालेला जास्त आढळून येतो). लघु आहार ( लाह्या मूग ) घ्यावा. दर्भ शय्येवर झोपावे. श्रम करू नये. दुपारी झोपू नये. शिळे अन्न खाऊ नये. काम क्रोध शोक करु नये. मोकळे सुतीचे कपडे घालणे. या मागचा उद्देश केवळ रजः प्रवर्तन व्यवस्थित व्हावे व स्त्री शारीर योग्य पद्धतीने कार्य करावे हा आहे. आजकाल PCOD, गाठी होणे, अति रक्तस्त्राव किंवा अत्यल्प रक्तस्त्राव, हनुवटीवर लव येणे, गर्भाशय निर्हरण, श्वेत प्रदर कष्टार्तव अश्या समस्या वाढल्या आहेत. अगदी शाळकरी मुलींना PCOS चा त्रास दिसून येतो. तासन् तास एकच सॅनिटरी पॅड चा वापर, जीन्स सारखे जाड तंग परिवेश रजः स्त्रावाला अडथळा निर्माण करतात. त्यामुळे दुर्गंध, कण्डू, त्वचा लालसर होणे पुरळं होणे अशा समस्या उद्भवतात.

रजःस्वला परिचर्या हिणविण्याकरीता नसून त्यांचे आरोग्य चांगले राहावे त्यांची काळजी घेतली जावी या दृष्टीने सांगितली आहे. त्यामुळे या ३ दिवसात घरातील प्रत्येक स्त्रीची काळजी त्यामागील शरीर विज्ञान समजून घेतल्या गेली तर नक्कीच लाभदायक ठरेल.

ayurveda

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button