जयललिता यांच्या पुण्यतिथीनिमित्त कंगनाने शेअर केले थलाईवीच्या सेटवरील फोटो

On the occasion of Jayalalithaa's death anniversary, Kangana shared a photo from Thalaivi's set

अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) सध्या हैदराबादमध्ये ‘थलाईवी’ (Thalaivi)नावाच्या चित्रपटाचे शूटिंग करीत आहे. तामिळनाडूच्या प्रख्यात अभिनेत्री आणि तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या जयललिता यांच्या जीवनार हा चित्रपट तयार होत असून यात कंगना जयललिता यांची भूमिका साकारीत आहे. शनिवारी जयललिता यांची पुण्यतिथी ( Jayalalithaa’s death anniversary) होती. त्यानिमित्ताने कंगनाने जयललिता यांच्या गेटअपमधील चित्रपटाच्या सेटवरील फोटो सोश मीडियावर शेअर केले आहेत. तिचे हे फोटो चांगलेच व्हायरल झालेले आहेत.

कंगनाने जयललिता यांची त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आठवण काढून त्यांना श्रद्धांजली वाहिली आणि तीन फोटो शेअर केले. यापैकी एका फोटोत जयललिता यांच्या रुपातील कंगना विधानभवनाच्या आवारातून चालत असताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोत ती कुठल्या तरी मीटिंगला जात असताना दिसत आहे तर तिसऱ्या फोटोत ती शाळकरी मुलांना मिड डे मिलचे वाटप करताना दिसत आहे. या फोटोंमध्ये कंगना जयललिता यांच्यासारखीच दिसत आहे.

या फोटोंसोबत कंगनाने, जय अम्माच्या पुण्यतिथीनिमित्त मी सेटवरील काही फोटो शेअर करीत आहे. हे फोटा आमचा चित्रपट ‘थलाइवी- द रिवोल्यूशनरी लीडर‘मधील आहेत. माझ्या टीमचे खूप खूप धन्यवाद. विशेषकरून आमच्या टीमचा कप्तान विजय सर यांचे खूप खूप धन्यवाद. त्यांनी सुपर ह्युमन होऊन चित्रपट पूर्ण केला आहे. आता फक्त एकच आठवडा उरला आहे असे म्हटले आहे. यासोबत कंगनाने हात जोडलेला इमोजीही शेअर केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER