धन्वंतरी जयंतीच्या निमित्ताने

dhanwantari jayanti

धनत्रयोदशीला समुद्रमंथनातून अमृत कलश घेऊन भगवान धन्वंतरी प्रगट (Dhanvantari Jayanti)झाले होते. चतुर्भूज धन्वंतरी च्या हाती शंख चक्र जलौका अमृतघट आयुर्वेद ग्रंथ दिसून येतो. धन्वंतरी हे वैद्यांचे देव. भगवान धन्वंतरीचे वर्णन करताना म्हटले आहे –

ॐ शंखं चक्रं जलौकां दधदमृतघटं चारुदोर्भिश्चतुर्मिः। सूक्ष्मस्वच्छातिहृद्यांशुक परिविलसन्मौलिमंभोजनेत्रम॥
कालाम्भोदोज्ज्वलांगं कटितटविलसच्चारूपीतांबराढ्यम।
वन्दे धन्वंतरिं तं निखिलगदवनप्रौढदावाग्निलीलम॥

आयुर्वेद (Ayurved) हे अथर्ववेदाचे उपांग मानल्या जाते. हजारो वर्षापूर्वी लिहिलेल्या आयुर्वेदातील सिद्धांत, चिकित्सा याकाळातही तेवढेच प्रभावी दिसतात. आता हेच बघा ना, हळदीचे गुण किंवा सुंठीचे गुण ग्रंथामधे लिहिल्या प्रमाणे अजूनही त्याच प्रकारे कार्य करतात. युग बदलले पण एखादे औषध शरीरावर कसे काम करेल हे आचार्यांनी सांगितल्याप्रमाणे आता देखील तसेच कार्यकारी आहे. आयुर्वेद सांगण्यामागचा मुख्य उद्देश ” स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम् आतुरस्य विकार प्रशमनं च |” म्हणजेच स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याची रक्षा करणे हे प्रथम कर्तव्य आहे.

त्याकरीता आहार, निद्रा ब्रह्मचर्य यांचा विचार दिनचर्या ऋतुचर्या पंचकर्म सांगणारे आयुर्वेद आहे. तर दुसरे प्रयोजन आहे आजारी व्यक्तीची चिकित्सा. कोणत्याही चिकित्साशास्त्रात इतका विस्तृत विचार ही केलेला नाही. जगाला देण्याकरीता भारताकडे जसे योग आहे तसेच आपले चिकित्साशास्त्र आयुर्वेद आहे. धन्वंतरी जयंती राष्ट्रीय आयुर्वेद दिन म्हणून साजरा केला जातो. आयुर्वेदाचा जनमानसात व ग्लोबल स्तरावर प्रचार व प्रसार होण्याकरीता खूप गरज आहे.

कोरोना (Corona) संक्रमण काळातही आयुष मंत्रालयाने अनेक विविध प्रयोग केले आहेत ज्याला यश देखील मिळत आहे. आयुष काढा या काळात अनेक ठिकाणी देण्यात आला अनेक रुग्णांवर आयुर्वेद चिकित्सा केली गेली. या कोरोनाच्या संक्रमणाचे संकट टळून सर्वांना आरोग्य, स्वास्थ्य लाभो ही धन्वंतरी चरणी प्रार्थना.

ही बातमी पण वाचा : उटणे – फक्त दिवाळी पुरतेच नाही महत्त्वाचे !

ayurveda

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER